पतींवर विनयभंगाचा आरोप; पत्नींनी दिल्या परस्परविरोधी तक्रारी
परतुर- पतींवर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या वतीने आरोपी पतींच्या पत्नींनी त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या परस्पर विरोधी तक्रारी परतुर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्या आहेत.पहिल्या प्रकरणामध्ये परतुर तालुक्यातील गुळखंड तांडा येथे राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेने आरोपी वकील दासू आढे यांनी दिनांक 25 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महिला शेतात एकटी काम करीत असताना आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा हात धरून तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, आणि कोणाला सांगितल्यानंतर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा याची पुनरावृत्ती दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतात झाली. याप्रकरणी आरोपी वकील दासू आढे राहणार वाटूर तांडा, यांच्याविरुद्ध भादवि कलम 376, 56 अन्वये परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दुसऱ्या प्रकरणात वाटुर तांडा येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मदन धोंडीराम आढे व सुनील शेषराव आढे, राहणार गुळखंड तांडा या दोघांनी संगणमत करून दिनांक 31 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तक्रारदाराच्या घरी आले आणि पती घरी आहे का? अशी विचारना केली, परंतु पती घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघांनीही तक्रारदाराच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तक्रारदाराने आरडा ओरड केल्यानंतर तिच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारून टाकण्याची धमकीही दिली. याप्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात कलम 452, 354, 506, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com