भीम फेस्टिवल मध्ये आनंद शिंदे वैशाली माडे लावणार हजेरी
जालना -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जालना शहरात “भीम फेस्टिवल 2023 “चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल अंतर्गत प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी आज हॉटेल अथर्व मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भीम फेस्टिवल चे अध्यक्ष अशोकराव पांगारकर, महासचिव संजय इंगळे, यांच्यासह शिवराज जाधव, सुनील साळवे, सुधाकर रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.
जालना शहरातील अंबड चौफुली जवळ दिनांक सहा आणि सात एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक सहा एप्रिल रोजी आनंद शिंदे तर दिनांक सात एप्रिल रोजी वैशाली माडे भीम गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com