Jalna Districtजालना जिल्हा

“ते “चोरी करण्यासाठी विरेगाव ते भोकरदन वापरायचे मॅक्झिमो गाडी

जालना- जालना तालुक्यासह परतुर आणि भोकरदन तालुक्यात जाऊन चोरी करणाऱ्या जालना तालुक्यातील एका टोळीला स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून चार लाख 63 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे.

भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर, पारध, तसेच परतूर आणि जालना तालुक्यातील सेवली येथे आत्तापर्यंत अनेक घरफोड्या झाल्या. या घरफोडयांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ,या घरफोड्या विरेगाव तांडा येथील आरोपी बाबासाहेब या शिंदे यांनी केले असल्याचे समजले .त्या अनुषंगाने बाबासाहेब शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. आणि त्याचे साथीदार पांडुरंग गंगाराम पवार, संजय ताराचंद राठोड, मुरलीधर शंकर राठोड ,सर्व राहणार विरेगाव तांडा यांच्यासह अन्य काही साथीदारांच्या मदतीने भोकरदन तालुक्यातील अनवा, भोकरदन शहर, आव्हाना, जळगाव सपकाळ ,पिंपळगाव रेणुकाई, जालना तालुक्यातील जयपुर, परतुर तालुक्यातील मसला आदि ठिकाणी चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा करण्यासाठी वापरलेली महिंद्रा कंपनीची मॅक्झिमो ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी, चोरीमध्ये मिळालेली एक लोखंडी पेटी, नगदी रक्कम 13एकशे आणि चार तोळ्याची सोन्याची लगड असा एकूण चार लाख 63 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. एकूण सात घरफोड्या केल्या असल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पारध पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या टीममधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले ,कृष्णा तंगे, गोकुळसिंह कायटे,गोपाळ  गोषीक ,आदींनी ही कारवाई केली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button