बाल विश्व

बाळंतपणात उद्भवलेल्या “त्या” जटील समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया

जालना- बाळंतपणानंतर महिलेच्या शरीरात झालेला बदल आणि त्यामुळे उद्भवलेल्या जटिल समस्येवर शस्त्रक्रिया करून मूत्ररोग तज्ञ डॉ. तुषार अग्रवाल यांनी ही समस्या सोडविली आहे.


घनसांवगी तालुक्यातील देवळी येथील महिला मनीषा राठोड यांचे सहा महिन्यांपूर्वी बाळंतपण झाले, आणि त्यावेळी आलेल्या अडचणीमुळे त्यांना वेगळी समस्या जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर संजीवनी हॉस्पिटल येथेही तपासणी केली. या तपासणीमध्ये मूत्ररोग तज्ञ डॉ. तुषार अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मनीषा राठोड यांनी शस्त्रक्रिया केली आणि लघुशंकेसाठी येणारे” ती” अडचण दूर झाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अग्रवाल यांना डॉ. अविनाश पोळ, सहाय्यक रानोजी मोताळे, अनिरुद्ध गवारे ,प्रशांत जाधव, रवी पवार, बद्री सेंडकर यांनी मदत केली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button