Advertisment
बाल विश्व

त्यांनी ही पातळी गाठणं म्हणजे बाळासाहेबांच्या पोटी…- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

जालना- उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना जी पातळी गाठली आहे ती पातळी गाठणे म्हणजे बाळासाहेबांच्या पोटी आलेल्या पुत्राला ही भाषा शोभत नाही. अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध केला.

आज जालन्या मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरवार्थ गौरव यात्रा काढण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. निषेधासोबतच त्यांनी श्री. ठाकरे यांना सल्लाही दिला आहे आणि तो सल्ला म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा दर्जा ठेवूनच नेत्यांबद्दल बोललं पाहिजे. मग तो नेता काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा भाजपचा असो. आपली पातळी सोडता कामा नये!. असा सल्लाही खासदार दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button