Jalna Districtजालना जिल्हा
आज जागतिक आरोग्य दिन “हेल्थ फॉर ऑल वर” होणार वर्षभर काम
जालना – आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 75 वर्षांपूर्वी डब्ल्यू.एच.ओ.(वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) म्हणजे जागतिक आरोग्य संघटना स्थापन झाली होती.या स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध देश एकत्र येत आरोग्य क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन आणि एका बोधवाक्यावर काम करतात. यावर्षीचे बोधवाक्य आहे “हेल्थ फॉर ऑल” नेमका याचा अर्थ काय आहे ते सांगत आहेत निरामय हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. पद्माकर सबनीस.
डॉ. सबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीर फक्त निरोगी असून चालत नाही तर ते निरोगी, सशक्त आणि मानसिक आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात आरोग्याच्या या तीनही क्षेत्रामध्ये नागरिक कसे सुदृढ होतील यावर भर दिला जाणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com