Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शरीराची सर्व्हिसिंग वेळच्यावेळी करा! आरोग्य शिबिरात तज्ञांचा सल्ला

जालना-एखादे नवीन वाहन घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आपण त्याची देखभाल दुरुस्ती म्हणजेच  सर्व्हिसिंग जशी वेळच्या वेळेला करतो त्याच पद्धतीने शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे तपासणी वेळच्या वेळेला करा! असा सल्ला तज्ज्ञांनी आज दिला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने देशपांडे हॉस्पिटल व मॅटरनिटी होम, माधवबाग, आणि इनरव्हील क्लब जालना मर्चंट, यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन शिक्षक आर. आर. जोशी, डॉ. प्रज्ञा देशपांडे, योग प्रशिक्षक मनोज लोणकर, दंतचिकित्सक सुनयना पळणीटकर, आहार तज्ञ मंजिरी मंडलिक (कुलकर्णी) आणि इनरव्हील क्लब ऑफ जालना मर्चंट च्या प्रेसिडेंट अनघा देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेने हे वर्ष” हेल्थ फॉर ऑल” असे साजरे करण्याचे ठरवले आहे त्या निमित्ताने किमान जालना जिल्ह्यातील रुग्णांची काळजी घेण्याच्या हिशोबाने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते केवळ व्यवसायानेच डॉक्टर असणाऱ्यांचे मार्गदर्शन नव्हे तर जीवनाचा अविभाज्य घटक व्यायाम म्हणजेच योगा विषयी योग प्रशिक्षक मनोज लोणकर यांनी योगासनांच्या माध्यमातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले. चेहऱ्याची सुंदरता ही दातांवर अवलंबून असल्यामुळे दातांची काळजी कशी घ्यावी, जेणेकरून दात सुंदर दिसतील त्यासोबत गोड पदार्थांमुळे लहान मुलांच्या दातावर होणारे परिणाम एवढेच नव्हे तर दात कशा पद्धतीने घासायचे यावर दंतचिकित्सक डॉ. सुनयना पळणीटकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. औरंगाबाद येथील आहार तज्ञ मंजिरी मंडलिक( कुलकर्णी) यांनी रोजच्या आहाराचा मानवाच्या शरीरावर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली तर डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी माधवबागची उपचार पद्धती तसेच हृदयरोग टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
दरम्यान या सर्वांच्या मार्गदर्शनातून एक सूर निघाला तो म्हणजे ज्या वस्तू आपण बदलू शकतो त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आपण विशेष काळजी घेतो ,परंतु आपण आपल्या शरीराची मात्र काळजी नाहीत. खरे तर शरीराचीच जास्त काळजी घेतली पाहिजे कारण ते एकदा बिघडले तर दुरुस्त करणे कठीण होते त्यामुळे दर तीन महिन्यांनी शरीराचीसर्व्हिसिंग  करा असा सल्लाही या तज्ञांनी दिला आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button