शोधायला गेले एक सापडल्या दोन तलवारी
जालना- तालुका जालना पोलिसांना मिळालेला माहितीवरून त्यांनी पांगारकर नगर मधील एका घरावर छापा मारला छाप्यादरम्यान त्यांना एक तलवार असल्याची माहिती मिळाली होती, मात्र ज्यावेळेस छापा मारला त्यावेळेस त्या घरातून दोन तलवारी सापडल्या आहेत.
हा छापा सोमवार दिनांक सहा रोजी पोलीस उपनिरीक्षक सय्यद मजीद यांनी टाकला.तालुका पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पांगारकर नगर येथील एलसीन विल्सन शिंदे वय 49, यांच्या घरात तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या घरावर छापा टाकला आणि या छापा मध्ये दोन फूट आणि अडीच फूट अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या आकाराच्या तलवारी सापडल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक सय्यद मजीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि तलवारी ही जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस कर्मचारी संदीप बेराड ,किशोर जाधव यांनी सय्यद मजीद यांना छाप्यासाठी मदत केली.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com