व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विभाग जिल्हाध्यक्षपदी साहिल पाटील
जालना: व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या जालना जिल्हा डिजिटल विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी एमसीएन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पिठोरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बाबत त्यांना दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी नियुक्त पत्र देण्यात आले. संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय धोरणे पत्रकारापर्यंत पोहोचवण्यासाठी साहिल पाटील यांची नियुक्ती केली असल्याचे नियुक्ति पत्रात म्हंटले आहे.या नियुक्ती बद्दल साहिल पाटील त्यांचे समाजातील सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, डिजिटल विभाग प्रदेश अध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी हे नियुक्त पत्र दिले आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, डिजिटल मिडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, आदींनी अभिनंदन केले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com