आपणही या!कुंडलिका व सीना पुनरुज्जीवन अभियान संवाद यात्रा उद्या
जालना-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर नद्यांच्या जनजागरण अभियानातंर्गत जालन्यातील कुंडलिका व सीना पुनरुज्जीवन अभियान संवाद यात्रा शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे.
कुंडलिका व सीना या दोन नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक आणि गाळ काढण्यासह नदीपात्रात स्वच्छता करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून शहरात सुरूवात झालेले आहे.
हिन्दूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधारा ते देहेडकरवाडी जुना लोखंडी पुलाजवळ मंमादेवी, राजमहेल चित्रपट गृहाजवळच्या पुलाजवळ कुंडलिका नदीपात्र स्वच्छ करण्यात आली आहे, सीना नदीपात्रात कन्हैय्यानगर, हनुमान घाट ते गोल्डन ज्युबली शाळा, संतोषी माता पुल ते बस स्थानक परिसरातील नदीपात्रातील कचरा प्लास्टिक काढून टाकण्यात आला आहे.
या दोन्ही नदीपात्रात संपूर्ण वर्ष स्वच्छ वाहते पाणी येण्याकरीता नदीच्या उर्ध्व दिशेस पाणलोटक्षेत्रात मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामे सुरूवात झाली आहेत.कुंडलिका व सीना संवाद यात्रेचा शुभारंभ महात्मा गांधी चमन पुतळ्याजवळ सायं पाच वाजता होणार असून जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड हे या शोभायात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
मंमादेवी मस्तगड मार्गे सुभाष चौक, मुथा बिल्डींग, ,महावीर चौक,जिंदल मार्केट,मामा चौक,वीर सावरकर चौक, हुतात्मा श्रध्दानंद चौक, नेहरू रोड काद्राबाद, मुर्ती वेस मार्गे छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे या शोभायात्रेचा समारोप होणार आहे.सामाजिक वनीकरण अधिकारी ,अमृत महोत्सव नदी संवाद यात्रेचे सचिव प्रशांत वरूडे,भाईश्री रमेशभाई पटेल, उद्योजक घनश्यामसेठ गोयल, उद्योजक शिवरतन मुंदडा, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, उदय शिंदे,नितीन काबरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
…
शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटना,औद्योगिक वसाहतीतील उद्योग व विद्यार्थी ,महीला युवक यांच्यासह सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन कुंडलिका सीना रिज्यूवनेशन फाऊंडेशनच्या अध्यक्ष , समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई च्या मराठवाडा प्रभारी नूतन देसाई यांनी केले आहे.
.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com