खा.संजय राऊत म्हणजे मनोरंजनाचा साधन ;ईडी संजय राऊत आणि खोके यापासून दूर राहा-खा. कीर्तिकर यांचा सल्ला
जालना -खा. संजय राऊत म्हणजे मनोरंजनाचा साधन झालं आहे, अशी खिल्ली शिंदे गटाच्या शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर यांनी आज जालन्यात उडवली. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विविध आघाड्यांचा मेळावा आज दिनांक 16 रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचीही उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री.कीर्तीकर पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर सत्तेची सूत्र भारतीय जनता पक्षाकडे आहेत परंतु महाराष्ट्रात सत्तेची सूत्र भाजपाकडे एक हाती कधी नव्हती आणि ती मिळण्याची ही शक्यता नाही, दरम्यान भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे कधीही स्वतःच्या ताकदीवर एक हाती सत्ता आणू शकत नाहीत. विशेष करून शरद पवार तर सत्तर चा आकडा देखील पार करत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. एक हाती सत्ता आणण्याचा प्रयोग देखील आतापर्यंत करून पाहिला परंतु तो असफल झाला आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर हिंदू मताच्या विभाजनाबद्दल बोलताना खासदार कीर्तिकर म्हणाले की, यापूर्वी 25 वर्षे शिवसेना भाजपाची युती होती आणि या युतीची एक वेगळी वोट बँक आहे. या वोट बँकेचे पुनर्जीवन केले तर पुन्हा ही मते युतीला मिळून सत्ता मिळवता येईल.
दरम्यान पत्रकारांनी ईडी संजय राऊत आणि खोके या तिघांपासून दूर राहावे असा सल्लाही खासदार गजानन कीर्तिकर यांनी शेवटी जाता जाता दिला.