खटल्याचा निकाल लावायचा आहे? राष्ट्रीय लोक अदालतचा फायदा घ्या!
जालना -जिल्हा सत्र न्यायालय जालना आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी” राष्ट्रीय लोक अदालत” आयोजित केली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे- वाघ यांनी ही माहिती दिली.
न्यायालयात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून आपापसात खटले मिटवण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रयत्न केला जातो. त्यामुळे पक्षकारांचा वेळ पैसा वाचतो आणि दोघांमध्ये तडजोड झाल्याने आपणच खटला जिंकला आहे अशी भावना दोघांच्या मनात राहून शत्रुता दूर होते. अपघात, मालमत्ता, कौटुंबिक कलह, अशा दाव्यांचा ताबडतोब निकाल लावण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत हा एक चांगला पर्याय आहे. पक्षकारांनी आपल्या वकिलांमार्फत हे दावे दाखल करावेत किंवा ज्यांना थेट या न्यायालयात दावा दाखल करायचा आहे अशांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहनही प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे- वाघ यांनी केले आहे. तसेच पक्षकारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या 02482-223625 किंवा 8591903625 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही सूचित केले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com