GDCC प्रकरण;3200 पानांचे आरोपपत्र? तक्रारदारांची संख्या घटली
जालना -GDCC, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणाचा तपास संपलेला नाही. आणि अजून आरोपींवर न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल झालेलं नाही या आठवड्यात ते दाखल होईल अशी शक्यता आहे विशेष म्हणजे सुमारे 3200 पानांचं आठ जणांवरचे हे दोषारोप पत्र असण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना सुरुवातीला ज्या प्रमाणात तक्रारी आल्या ती गती आता मंदावल्याची दिसत आहे. पुणे येथून चार आरोपींना अटक केल्यानंतर 18 फेब्रुवारी पर्यंत सुमारे 132 तक्रारी होत्या त्या आता दीडशे पर्यंत गेल्या आहेत. म्हणजे मागील दोन महिन्यांमध्ये सुमारे वीस तक्रारींचीच वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांची रक्कम मोठी आहे हे सर्वश्रुत आहे. एका- एका गुंतवणूकदाराची एक लाखांपासून 30 लाखापर्यंत गुंतवणूक आहे. गुंतवणूकदार देखील रक्कम गुंतवल्याची कबुली देतात मात्र तक्रार करायलाही धजत नाहीत? त्यामुळे तक्रारींची संख्या कमी का झाली? हा एक प्रश्न आता उद्भवलेला आहे.
एकीकडे अटकपूर्व जामिनासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जालना जिल्ह्याचे प्रमोटर किरण खरात आणि दीप्ती खरात यांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता उच्च न्यायालयात न्यायालयात प्रलंबित आहेत. पुण्याच्या चार आरोपींनी पोलीस कोठडी भोगल्यानंतर न्यायालयीन कोठडीत सध्या ते कारागृहात आहेत. त्यांचाही जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे .त्यामुळे आता हे सर्वच प्रकरण उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. या प्रकरणात दिलासा देणारी थोडी बाजू म्हटली तर सौ. किरण खरात यांच्याकडे महिला म्हणून उच्च न्यायालयाने सहानुभूतीने पाहिले आणि 20 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. परंतु 20 तारखेला न्यायालय परत काय निर्णय देईल याकडे सर्वांचेच लक्ष आहे. पोलीस आपले काम करत आहेत परंतु गुंतवणूकदारांमध्ये काय चालले आहे? त्यांची मानसिकता काय आहे? तक्रारी आहेत का? असतील तर त्या का येत नाहीत? का “भीक नको, कुत्रा आवर” अशा म्हणी प्रमाणे त्यांची स्थिती झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न केला गेला. या प्रयत्नातून समोर आलेल्या उत्तरांमध्ये असं आढळून आलं की, या प्रकरणांमध्ये 16 जानेवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर 27 जानेवारीला हा जीडीसीसी कॉइन बँकेच्या लिस्टवर आला. म्हणजे कुठेतरी त्याला शासन दरबारी नाही तरी क्रिप्टो च्या मार्केटमध्ये खरेदी विक्रीला सुरुवात झाली. त्यानंतर तो बीट मार्ट आणि कॉइन डब्ल्यू इथेही नोंदणी झाला. आणि या सर्व प्रकारानंतर जिथे अशा प्रकारच्या इतर क्रिप्टो करन्सीच्या व्यवहार चालतो त्या “कॉइन मार्केट” वर देखील याची नोंद झाली आहे. त्यामुळे कदाचित गुंतवणूकदारांना आपला पैसा परत मिळू शकतो !अशी आशा वाटली असावी. ज्यावेळेस आरोपी पोलीस कोठडीत होते त्याच वेळेस तक्रारींची संख्या वाढली, परंतु त्यांना नंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे हे आरोपी बाहेर आल्यानंतर पुन्हा हा व्यवहार सुरळीतपणे सुरू होईल अशी ही अनेक गुंतवणूकदारांना अपेक्षा होती,आणि आहे. त्यामुळे देखील त्यांनी तक्रारी केलेल्या नाहीत. सद्य परिस्थितीत जेडीसीसी कॉईनचा भाव कमी असो अथवा जास्त असो त्याची उलाढाल सुरू आहे. हा एक दिलासा गुंतवणूकदारांना मिळाला आणि जर एखाद्या गुंतवणूकदाराला नफा तोट्याची पर्वा न करता गुंतवलेला पैसा कमी जास्त प्रमाणात का होईना परत मिळत आहे. मागील आठवड्यामध्ये एका कॉइन ची किंमत एक ते दीड हजार पर्यंत गेली होती तीच किंमत या आठवड्यामध्ये साडेसातशे ते हजार रुपयांपर्यंत आहे. म्हणजे सध्या क्रिप्टो करेंसी च्या बाजारात जीडीसीसी कॉइन चा भाव मागील आठवड्याच्या तुलनेत उतरलेला आहे. त्यामुळे जसा उतरला आहे तसाच चढेलही असेही अपेक्षा अनेक गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे देखील तक्रारींची संख्या वाढली नसल्याचा अंदाज आहे. हा सर्व प्रकार गुंतवणूकदारांच्या क्षेत्रात चालू आहे परंतु पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये आरोपींना जामीन मिळू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने पुरावे देखील जमा केलेले आहेत. त्यामुळे दिनांक 20 रोजी न्यायालय काय निर्णय देईल
यावर देखील बरच काही अवलंबून आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com