Jalna Districtजालना जिल्हा

खून करणाऱ्या आरोपीकडून शस्त्र जप्त करून अन्य दोघांना अटक करण्याची मागणी

जालना -वडिलांचा खून करणाऱ्या आरोपीकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र जप्त करावे आणि अन्य दोघांना अटक करावी अशी मागणी अंबड येथे राहणाऱ्या मंदाकिनी ज्ञानदेव भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंदाकिनी भोसले यांचे वडील पंडित काळे यांना या प्रकरणातील आरोपी किशोर पवार, नितीन जाधव आणि अन्य एक जण अशा तिघांनी येऊन घरगुती भांडणाच्या कारणावरून मारहाण केली आणि नंतर सोबत आणलेल्या गावठी पिस्टल मधून गोळ्या झाडून ठार केले. मंदाकिनी भोसले यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे .याप्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात कलम 302, 449, 504, अन्वये गुन्हा दाखल आहे आणि एक आरोपी देखील अटक आहे. परंतु त्याच्याकडून पोलिसांनी अद्याप पर्यंत गुन्हा मध्ये वापरलेले शस्त्र जप्त केले नाही. तसेच उर्वरित दोन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये वापरलेले शस्त्र जप्त करावे, आणि उरलेल्या दोन आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी ही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button