कुठे गेले ते हवेत सटाक्या मारणारे आणि वॉटर ग्रीड ची घोषणा करणारे पुढारी?-आ.कैलास गोरंट्याल
जालना -नगरपालिकेवर प्रशासन आल्यापासून जालनेकरांना 15 ते 20 दिवसानंतर पाणी मिळत आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जालन्याच्या काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यादरम्यान त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली ,केवळ हवेत सटक्या मारायच्या, पत्रकार परिषद घ्यायची, परंतु शहराला पंधरा दिवस पाणीही द्यायचे नाही आणि वॉटर ग्रीडच्या गप्पा करायच्या? आता कुठे गेले आहेत ते? अर्थसंकल्पात एक रुपयाची देखील तरतूद नाही, मेडिकल कॉलेज नाही अशा अनेक गोष्टींवर आमदार गोरंट्याल यांनी प्रकाश टाकला.
दरम्यान जालना नगरपालिकेवर प्रशासन आल्यापासून शहरातील सर्व नियोजन बिघडलेले आहे. वेळेवर पाणी नाही स्वच्छता नाही, विज बिल भरणे अभावी वीज कट होते, अशा अनेक समस्यांमुळे जालनेकर त्रस्त आहेत. वारंवार प्रशासनाला सूचना देऊनही यामध्ये काहीच फरक पडत नसल्यामुळे आज आमदार गोरंट्याल यांनी धरणे आंदोलन केले .”मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे” म्हणणारे देखील आता दिसत नाहीत. एवढेच काय तर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यामध्ये येऊन पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला होता परंतु आता त्यांची सत्ता असताना देखील जालनेकरांना 15 ते 20 दिवसानंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे हे पुढारी सध्या कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सर्व अडचणींवर लवकर तोडगा नाही निघाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची धार तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आजच्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद यांच्यासह महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com