Jalna Districtजालना जिल्हा
“पहिल्या धारेवर” पहाटे पाच वाजता स्थानिक गुन्हा शाखेचा छापा; चार लाखांचे सडके रसायन नष्ट
जालना- स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या हातभट्टी बनवण्याच्या ठिकाणांवर पहाटे पाच वाजता छापे मारले. जुना जालन्यातील कैकाडी मोहल्ला भागामध्ये मारलेल्या या छाप्यामध्ये तीन महिलांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. हातभट्टीची दारू बनवण्यासाठी लागणारे सडके रसायन, लाकूड ,ड्रम असे सुमारे चार लाखांचे साहित्य नष्ट केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकाने हा छापा मारला. या छाप्या मध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,सामुयल कांबळे, फुलचंद हजारे, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, कैलास चेके, आदींचा समावेश होता.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com