“त्या” तेरा वर्षाच्या मुलीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला खून
जालना-गावातून पळून गेलेल्या दोन मैत्रिणींपैकी एका अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी जालना तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. दरम्यान या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 16 एप्रिल रोजी जालना तालुक्यातील शंभू सावरगाव येथून दोन मुली पळून गेल्या होत्या .त्यापैकी रात्री दोन वाजेच्या सुमारास जालिंदर लक्ष्मण राठोड यांची मुलगी परत आली परंतु दुसरी मुलगी परत आलीच नाही. तिचा तपास घेत असताना दिनांक 17 एप्रिल च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास शंभू सावरगाव शिवारातील कृष्णा धोत्रे यांच्या शेतात असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये पळून गेलेल्या पायल मच्छिंद्र जाधव या तेरा वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, आणि पोलीस पुढील तपास करत होते. हा तपास करत असताना पोलिसांनी मयत पायल जाधव हिच्या मैत्रिणीचे वडील जालिंदर लक्ष्मण राठोड यांनी आपल्या मुलीची बदनामी सर्व गावात होईल म्हणून पायल चा काटा काढला. जालिंदर लक्ष्मण राठोड, त्यांची मुलगी हे दोघे राहणार शंभू सावरगाव तर जीवन मोहन चव्हाण, युवराज राम राठोड, राहणार राठोड नगर, आणि अनिल सुरेश राठोड राहणार डांबरी या पाच जणांविरुद्ध मंगळवार दिनांक 25 रोजी खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com