Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“त्या”खून केलेल्या अनोळखी तरुणाचा तीन दिवस कुजला मृतदेह; ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

जालना- जालना तालुका पोलिसांना दिनांक 17 एप्रिल रोजी तालुक्यातील आश्रम फाटा ते पिरकल्याण रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाखाली शेतामध्ये अडवणीला टाकलेला 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला आहे. तीन दिवसापूर्वीच हा मृतदेह अरुण टाकला असावा असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी आरोग्य विभागाकडून अहवाल आला आहे या अहवालानुसार या तरुणाला डोक्यामध्ये मारहाण केल्यामुळे डोके फुटले असावे आणि त्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला आहे असा अहवाल आला आहे. त्यानंतर हा मृतदेह फेकून दिला असल्याचा अंदाज तालुका पोलिसांनी वर्तविला आहे. पीरकल्याण चे पोलीस पाटील चंद्रकांत बाबुराव वाघमारे यांनी बीट अंमलदार श्री. जारवाल यांना दूरध्वनीवरून दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पिरकल्याण शिवारामध्ये लक्ष्मण पुंजाराम शिरसागर यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली एका 25 वर्षे तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मृतदेहाचा पंचनामा करून हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला होता. त्यादरम्यान डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले आणि शवविच्छेदनाचा अहवाल काल दिनांक 26 रोजी प्राप्त झाल्यानुसार पोलिसांनी हा मृतदेह खून करून इथे आणून टाकल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चेहरा पूर्णपणे विद्रूप केला असून या मृतदेहाच्या हातावर एस पी असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले आहे. अंगामध्ये निळा रंगाचे कपडे आहेत दरम्यान बाजूच्या जिल्ह्यामधून या तरुणाचा खून करून मृतदेह इथे आणून टाकला असावा आणि तीन दिवसांपूर्वी तो केला असावा ज्यामुळे हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला आहे. असा अंदाजही व्यक्त केला आहे. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भादवि कलम 302 नुसार खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक 18 रोजी पोलिसांनी शासकीय नियमानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाय हे करीत आहेत.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button