Jalna Districtजालना जिल्हाराज्य

GDCC प्रकरण;2761 पानांचे दोषारोप पत्र दाखल ;जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण ; निकाल ठेवला राखून

जालना-GDCC (ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन) 16 जानेवारीपासून जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात धुमसत असलेल्या (GDCC, ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन)प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात आज तब्बल पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 2 हजार 7621 एवढ्या मोठ्या पानांचे दोषारोप पत्र दाखल होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.

16 जानेवारीला जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये जीडीसीसी प्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता, या शाखेच्या पोलिसांनी 4 फेब्रुवारीला संशयित आरोपी म्हणून पकडलेले सय्यद इरफान, व्यंकटेश भोई, रमेश उत्तेकर आणि अमोल मेहतर हे चौघेजण सध्या जालना येथे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता तसेच श्री. व सौ. खरात दांपत्य यांनी देखील अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता हे दोन्ही अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे.
दरम्यान आज या दोन्ही प्रकरणी न्यायालयाने आज दि.28 रोजी बाजू ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात दिनांक दोन मे रोजी निर्णय दिला जाणार आहे.


फसवणूक झाल्याच्या तक्रारी सुरुवातीला प्रचंड आल्या होत्या आजही सुमारे दीडशे तक्रारी आहेत परंतु सध्या या तक्रारींचा ओघ कमी झाला आहे कारण कारण ज्या मार्केटमध्ये या जीडीसीसी कॉइन ची खरेदी विक्री केल्या जाते त्या एल बँक वर हा कॉइन लिस्ट झाला आहे त्यासोबत काही गुंतवणूकदारांची गुंतवणूक या प्रमोटरांनी परत केल्याची ही चर्चा सुरू आहे त्यामुळे आता फारसे तक्रारदार पुढे येत नाहीत . परंतु आणखीनही लाखोंची गुंतवणूक असलेल्या तक्रारदारांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे न्यायालयाचे निर्णयावर या प्रकरणाचे मोठे भवितव्य अवलंबून आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button