Jalna Districtजालना जिल्हाराज्य

GDCC प्रकरण; किरण खरात यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने आज दिला”हा”आदेश

जालना- जीडीसीसी( ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन) म्हणजेच क्रिप्टो करेंसी प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खरात दाम्पत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी जालना जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता तो फेटाळून लावल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे . किरण खरात यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत .याच  अटीवर न्यायालयाने किरण खरात यांची पत्नी दीप्ती खरात यांना जामीन दिला आहे.

जीडीसीसी प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी श्री व सौ खरात दांपत्यांनी जालना येथील न्यायालयात अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर खरात दांपत्य आणि न्यायालयीन कोठडीत असलेले इतर चार आरोपी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान सौ. खरात यांना आठ दिवसांपूर्वीच अंतरिम जामीन मिळाला होता. त्यानंतर न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता आज दिनांक 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी किरण खरात यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले आहेत .दरम्यान प्राप्त माहितीनुसार किरण खरात यांच्या अटकपूर्व जामीनावर वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळू का? का? जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेता असे विचारल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आल्याचे समजते .तसेच दीप्ती खरात या सध्या अंतरिम जामिनावर आहेत त्यामुळे किरण खरात यांनी शनिवार दिनांक सहा तारखेपर्यंत पोलिसांना शरण जावे असेही म्हटले आहे, तसे न झाल्यास दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज रद्द होईल अशी अटही न्यायालयाने घातल्याचे समजते त्यामुळे. आता पुढील चार दिवसांमध्ये या प्रकरणात काय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले यातील चार आरोपींच्या जामीन अर्जावरील निकाल देखील न्यायालयाने राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर गुंतवणूकदारांमध्ये चल विचार सुरू झाली आहे कारण अटकपूर्व जामीन मिळाला असता तर किरण खरात यांच्यावर विश्वास ठेवून अवलंबून असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये पैसे परत मिळण्याची शक्यता वाढली होती परंतु आजच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे किरण खरात जर पोलिसांना शरण आले नाही तर, पोलिस त्यांच्या मागावर आहेतच त्यांना अटक होऊन पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल आणि तिथून पुढे हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने सुरू होईल.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button