Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

तुमचं झालं आता आमचंही करा! राज्य उत्पादन शुल्कचा दुय्यम निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

भोकरदन- बाराही महिने लेन देण्याच्या कार्यक्रमावरून गपचूप सुरू असलेल्या परमिट रूम आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्यामधील कारभार हा जग जाहीर आहे. परंतु आता वारंवार होणाऱ्या त्रासाला परमिट रूम चालक देखील वैतागले आहेत. याचाच परिणाम आज भोकरदन तालुक्यात दिसून आला.” तुमचं झालं आता आमचंही करा “असं म्हणत 15 हजार रुपयांची लाच घेताना संजय महादेव पवार या दुय्यम निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे .

भोकरदन तालुक्यातील माहोरा येथे एका परमिट रूमचे नूतनीकरण संजय महादेव पवार वय 46 वर्ष दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय भोकरदन यांनी नूतनीकरण करून दिले. नूतनीकरण झाल्यानंतर त्या कामाचा मोबदला म्हणून परमिट रूम मालकाकडे तीस हजार रुपयांची मागणी केली तडजोडी आणखी पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले परंतु परमिट रूम चालकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली या तक्रारीची शहानिशा करून या विभागाचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी सापळा रचला आणि आज 15 हजार रुपयांची लाच घेताना संजय महादेव पवार यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button