अमरावतीची टोळी जालन्यात येऊन करायची वाहन चोरी ;एका आरोपीची चार टोपण नावे
जालना- साधारण पंचवीस वर्षांपूर्वी परिवारामध्ये एखाद्याला एक किंवा दोन टोपण नाव असायची, मात्र ती प्रेमाने ठेवलेली असायची. परंतु चंदनझिरा पोलिसांनी एका वाहन चोराला पकडले आहे आणि त्याची तब्बल चार टोपण नावे आहेत. त्याच्या या टोपण नावामुळे पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये तो अनेक वेळा यशस्वी देखील व्हायचा.
अमरावती येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 28/ 2023 कलम 379 मधील प्रकरणाचा तपास करत असताना दोन आरोपींना पकडले, आणि त्यांना पोलिसांचा खात्या दाखवल्यानंतर जालन्यातून चोरलेल्या दोन गाड्या देखील पोलिसांच्या हाती लागल्या आहे.
जालना शहरातील श्रीकृष्ण, रुक्मिणी नगर भागात राहणाऱ्या विलास गुलाबराव चव्हाण यांची एम एच 21 व्ही 37 91 ही 7 सीटर शेवरलेट चार चाकी गाडी दिनांक 28 ते 29 एप्रिलच्या मध्यरात्री त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी चंदंझीरा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चंदनझिरा पोलिसांनी जिल्ह्यातील यंत्रणेसह शेजारच्या जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेला सतर्क केले होते. त्या अनुषंगाने अमरावतीच्या स्थानिक गुन्हा शाखेने काही वाहन चोर पकडले होते. त्यामध्ये मोहम्मद मुदसिर उर्फ टॅटू उर्फ एमडी उर्फ जग्गी मोहम्मद युनूस वय वर्ष 25 राहणार न्यू टारफाईल कॉलनी, गाजिया मज्जित जवळ, अकोला, याला आणि त्याचा सहकारी मुख्तार अली करामत अली वय 25 धरम काट्याच्या, मागे वलगाव रोड अमरावती, हे अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यामध्ये कलम 379 अंतर्गत आरोपी आहेत. त्यांना पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला होता. त्यानंतर या आरोपींनी इतर ठिकाणांच्या वाहनासोबतच बदनापूर येथून एक आणि जालना शहरातून विलास चव्हाण यांची शेवरलेट अशा दोन गाड्या चोरल्याची कबुलीदिली. त्यानंतर त्यांची अमरावती तुरुंगात रवानगी करण्यात आली .दरम्यानच्या काळात अमरावतीच्या पोलिसांनी चंदनझिरा पोलिसांशी संपर्क साधून येथून चोरून नेलेल्या वाहनांची कबुली त्यांच्याकडे असलेल्या वरील दोन आरोपींनी दिल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने अमरावती येथील या आरोपींची पोलीस कोठडी संपतात चंदनझीरा पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन दिनांक 3 एप्रिल रोजी या प्रकरणाचे तपासी अमलदार एम. एन. खंडागळे आणि त्यांचे सहकारी अशोक जाधव यांनी अमरावती गाठले आणि तेथून या दोन आरोपींना ताब्यात घेऊन जालन्यात आले. दरम्यान काल दि.4 रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . या प्रकरणातील आणखी एक आरोपी फैजुद्दीन उर्फ राज पिता फयाजुद्दीन राहणार काजळेश्वर तालुका कारंजा जिल्हा वाशिम याचा पोलीस शोध घेत आहेत.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com