1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

GDCC प्रकरण; किरण खरात पोलिसांना शरण; उच्च न्यायालयाचा आदेश वाचला का? न्यायमूर्तींची पोलिसांना विचारणा

जालना -GDCC (ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन )प्रकरणी जालन्याचे प्रमोटर किरण खरात हे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना शरण गेले आहेत. उच्च न्यायालयाने आज दुपारी बारा वाजेपर्यंत खरात यांना शरण जाण्याची मुदत दिली होती. दरम्यान शरण गेल्यानंतर या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर पायघन यांनी खरात यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

16 जानेवारीला जालना तालुका पोलीस ठाण्यात खरात दांपत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळ पासून न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने सहानुभूतीने विचार करत किरण खरात यांच्या पत्नीला मागील आठवड्यात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता, तर किरण खरात यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना शनिवार दिनांक सहा रोजी दुपारी 12 वाजेच्या आत शरण जाण्याचा आदेश दिला होता, तसे न झाल्यास सौ. खरात यांची अटकपूर्व जामीन रद्द होईल अशी अटही घातली होती. त्यामुळे आज सकाळी साडेअकरा वाजता किरण खरात हे आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर कार्यालयीन सोपस्कार पूर्ण करून तपासी अधिकारी श्री. पायघन यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले. पुढील तपासासाठी प्रभारी सरकारी अभि अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी न्यायालयाकडे किरण खरात यांच्या सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु न्यायालयाने चार दिवसांचीच म्हणजेच दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.


न्यायालयाचा आदेश वाचला का?
दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्री. एस. जी. आडके यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला 12 वाजेच्या आत मध्ये शरण येण्याचा आदेश दिलेला आहे, तो आदेश मी वाचलेला आहे. असा आदेश असताना दुपारी दोन वाजता अटक कशी? तसेच जो आरोपी पोलिसांना तीन महिने सापडत नाही तो कोर्टाच्या आदेशाने एका दिवसात हजर होतो कसा? असे प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना उपस्थित केले. यासंदर्भात उत्तर देताना तपाशी अधिकारी म्हणाले की किरण खरात हे बाराच्या आत मध्येच कार्यालयात आले होते परंतु कार्यालयीन कामकाज पूर्ण करून घेण्यामध्ये वेळ गेला आणि दुपारी दोन वाजता त्यांना अटक केली आहे.
आरोपींच्या वतीने ज्येष्ठविधीज्ञ श्री. लिंगायत यांनी काम पाहिले आणि या प्रकरणातील सर्व चौकशी यापूर्वी झालेली आहे, त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये अशी विनंती न्यायालयाला केली परंतु ही विनंती फेटाळून लावत तपाशी अधिकाऱ्यांनी आरोप पत्र दाखल झाले आहे आणि अद्यापही बरीच चौकशी करणे बाकी आहे त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आणि न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

आणखी किती आरोपी आहेत ? असे विचारणा न्यायालयाने केल्यानंतर एकूण आठ आरोपी या प्रकरणात आहेत, त्यापैकी चार आरोपी यापूर्वीच पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी पूर्ण करून त्यांना जामीन मिळाला आहे. एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी अद्याप फरार आहेत अशी माहिती न्यायालयाला दिली आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button