कायदा व सुव्यवस्थेमुळे पोलीस प्रशासनाने बदलला मुहूर्त?; चार तारखेलाच पोलिसांनी केली होती मूर्तीवेसवर कारवाईची तयारी
जालना -साडेतीनशे वर्षांपूर्वीची निजाम कालीन मूर्ती वेस म्हणून जालना शहरात एक प्राचीन वास्तू आहे .या वास्तूच्या खालूनच जाण्या येण्यासाठी रस्ता आहे परंतु सुमारे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे यावेसेचा काही भाग पडला आणि हा रस्ता बंद झाला. हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे विविध प्रकारची आंदोलने झाली परंतु या मूर्तीवेस चा ताबा जालना नगरपालिकेकडे आहे आणि जागा वक्फ बोर्डाची आहे, त्यामुळे पडलेली ही वास्तू दुरुस्त करायची कोणी? या वादामध्ये हा रस्ता बंद होता. दुरुस्त करण्यासाठी व वक्फ बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र नगरपालिकेला दिले होते. परंतु जागा वक्फ बोर्डाची आहे त्यामुळे आम्ही का दुरुस्त करायची? असा प्रश्न पालिकेने उपस्थित केला होता. त्यानंतर देखील जनप्रक्षेप लक्षात घेता नगरपालिकेच्या वतीने दोन वेळा या मूर्तीवेसच्या दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या परंतु ती दुरुस्त करण्यासाठी कोणताही गुत्तेदार पुढे आला नाही. या दोघांच्या वादामध्ये आज दिनांक सात रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास या वास्तूचा राहिलेला भाग पोलीस बंदोबस्तामध्ये हटविण्यात आला आहे .त्यामुळे आता हा रस्ता वाहतुकीला खुला झाला आहे. चार तारखेला होणाऱ्या या कारवाईची कुन-कुन Edtv News ला लागली होती आणि त्या अनुषंगाने तीन तारखेला संध्याकाळीच मूर्तीवेस चे चित्रीकरण Edtv News न्यूज ने करून ठेवले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून या चौकामध्ये असलेल्या अनेक शाळा आहेत, महत्त्वाच्या बँका आणि हॉटेल्स देखील आहेत. तसेच याच रस्त्यावरून पुढे सिंदखेड राजा, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि राज्य राखीव बल गट क्रमांक तीन कडे देखील जाण्यासाठी हाच रस्ता आहे .त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आहे.
चार तारखेचा मुहूर्त टाळला?
नगरपालिकेने दोन मे रोजी सदर बाजार पोलिसांना पत्र दिले आणि त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारीही सुरू झाली होती. प्राप्त माहितीनुसार दिनांक चार मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई होणार होती त्यासाठी इतर पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये चार पोलीस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक, 97 अंमलदार आणि नऊ मोठी वाहने असा बंदोबस्त दिनांक 3 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही समजते. पाच वाजता हा बंदोबस्त तैनात झाला आणि संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सकाळी होणारी ही कारवाई रद्द करण्याच्या अचानक सूचना दिल्या गेल्या. कदाचित चार तारखेला कामकाजाचा दिवस असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तारीख पुढे ढकलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आज पहाटे झालेल्या या कारवाईसाठी चार पोलीस निरीक्षक,3 सहाय्यक पोलीस निरीक्षक ,37 अंमलदार, एक आरसीपी प्लॅटून तसेच पेट्रोलिंग साठी दोन पीएसआय 20 अंमलदार स्ट्राइकिंग पेट्रोलिंग साठी एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा अंमलदार तर नवीन आणि जुना जालना हद्दीमध्ये मोटरसायकल वरून पेट्रोलिंग करण्यासाठी दोन पोलीस निरीक्षक, तेरा आमलदार, असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आत्तापर्यंत केलेली आंदोलने .हा रस्ता सुरळीत करावा म्हणून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, माजी नगरसेवक जगदीश भारतीय, यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी देखील हा रस्ता अडवून रस्ता सुरळीत करण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन केले होते.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com