GDCC प्रकरण; किरण खरात यांच्याकडून दोनआलिशान कार जप्त
जालना-GDCC ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या ताब्यात असलेले जालना जिल्ह्याचे प्रमोटर किरण खरात यांच्याकडून दोन आलिशान कार आज दिनांक आठ रोजी जप्त करण्यात आल्या आहेत .
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक सहा रोजी किरण खरात हे आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना शरण गेले होते, त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या अनुषंगाने या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी पोलीस कोठडीत असलेले किरण खरात यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात बोलावून चौकशी सुरू केली आहे, आणि या चौकशी मधून निष्पन्न झालेल्या दोन आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक गुन्हा शाखेच्या दारात अशा महागड्या कारचे तोरण दिसायला लागले आहे. आत्तापर्यंत त्यांनी आठ कार जप्त केल्या आहेत, त्यामध्ये आता पुन्हा या दोन कारची भर पडली आहे.अशा या महागड्या कार आर्थिक गुन्हाशाखेच्या दारात आणि त्यानंतर जिथे हा गुन्हा दाखल झाला आहे त्या तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दिसत आहेत. दरम्यान आज जप्त केलेल्या या दोन गाड्यांमुळे तपासातील प्रगती दाखवून पोलीस अधिकारी किरण खरात यांना पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अशाच पद्धतीने त्यांनी यापूर्वी पुणे येथून आणलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली होती आणि 14 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण केली होती.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com