Jalna Districtजालना जिल्हा

पहिला महापौर शिवसेना-भाजप युतीचा होणार! माजी मंत्री खोतकर यांचा दावा

जालना -जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत होणार असल्याची उद्घोषणा राज्य सरकारच्या वतीने काल दिनांक नऊ मे रोजी करण्यात आली आहे, आणि त्या संदर्भात राजपत्रातही नोंद झाली आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 10 रोजी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मनपामध्ये पहिला महापौर हा शिवसेना आणि भाजप युतीचाच होईल असा दावाही केला.

दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत बोलताना श्री.खोतकर म्हणाले की जालना जिल्हा निर्मितीनंतर पहिली मोठी घोषणा करण्यात आली आहे. महानगरपालिका झाल्यामुळे जालन्याच्या विकासाला गती मिळेल आणि जालना बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यासोबत सर्वच क्षेत्रात जाण्याची भरारी देखील होऊन उद्योगांना चालनाही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सुविधा वाढतील, जनतेला चांगल्या सुविधा मिळतील आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे महानगरपालिका झाल्यानंतर प्रत्येक विभागाला स्वतंत्र अधिकारी मिळेल त्यामुळे तो सक्षमपणे काम करू शकेल आणि याचा फायदा सामान्य जनतेला होईल. महानगरपालिका झाल्यानंतर कर वाढ होईल अशी अनेकांच्या मनामध्ये भीती आहे मात्र कोणतीही कर वाढ होणार नसल्याचेही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
खरंतर आजच्या परिस्थितीमध्ये जालना नगरपालिकेमध्ये मुंबई पेक्षाही जास्त पाणीपट्टी वसूल केल्या जात आहे आणि हा सर्व भार मावळत्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची देण असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button