GDCC प्रकरण; किरण खरात यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ
जालना-GDCC( गोल्डन डिजिटल कॅश कॉइन) प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या ताब्यात असलेले जालनाचे मुख्य प्रमोटर किरण खरात यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
16 जानेवारीला पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांपासून जीडीसीसी प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील घालण्याचे मुख्य आरोपी किरण खरात हे दिनांक सहा रोजी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना शरण आले होते. त्या दिवशी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. आज दिनांक 10 रोजी मुदत संपत होती, मुदत संपल्यामुळे आर्थिक गुन्हा शाखेचे आणि या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी आज पुन्हा किरण खरात यांना न्यायालयासमोर हजर केले आणि तपासामध्ये प्रगती दाखवत खरात यांच्याकडून दोन आलिशान कारही जप्त केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले ,तसेच आणखी काही जप्ती करण्याचे बाकी असल्याची सांगितले. ही सर्व सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने किरण खरात यांच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा पाच दिवसांची वाढ केली आहे ,आणि आता दिनांक 15 पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान दोन वाहनांसोबतच आणखी दोन तक्रारींची देखील वाढ झाली असल्याचे समजते. सरकार पक्षाच्या वतीने प्रभारी सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com