1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सात लेकरांच्या आईने तीन लेकरांच्या बापासोबत जुळलेल्या प्रेम संबंधातून पतीचा केला खून!10 मुले रस्त्यावर

जालना- एका सात लेकरांच्या आईने तीन लेकराच्या बापासोबत जुळलेल्या प्रेम संबंधामुळे पतीचा खून केला, आणि या संदर्भात तिने कबुली दिली आहे. पतीच्या प्रियसीला जाळ्यात अडकवण्यासाठी पोलीस ठाण्यात दिलेल्या खोट्या तक्रारी मध्ये आता स्वतःच आरोपी झाली आहे. अशा जिने आणि तिचा प्रियकर रुपेश योहानराव शिंदे या दोघांनाही तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

जालना शहरातील टीव्ही सेंटर भागामध्ये असलेल्या म्हाडा कॉलनीत दिनांक सहा मे च्या रात्री खाजगी क्षेत्रात काम करणारे प्रमोद झिने हे रात्री मद्य प्राशन करून अंगणामध्ये बाज टाकून झोपले होते. दिनांक सातच्या सकाळीच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात माखलेला दिसून आला. क्षणार्धात ही बातमी सर्वत्र पसरली, पोलीस यंत्रणाही दाखल झाली. दरम्यान या प्रकरणात अशा झीने हिने तालुका पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पतीच्या प्रियसीनेच आपल्या पतीचा खून केला आहे अशा आशयाची तक्रार दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि वाळूज परिसरातून त्या प्रियेसी महिलेला ताब्यात घेतले. मात्र त्या महिलेने ही घटना अमान्य केली आणि सहा महिन्यापासून संपर्कात नसल्याचेही सांगितले.दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणाचा तपास लावला आहे आणि प्रमोद झीने यांची पत्नी आशा झीने हिने खून केल्याची कबुली दिली आहे.

अशी आहे पारिवारिक पार्श्वभूमी प्रमोद झीने आणि आशा हे नात्याने आत्या- मामाची मुले आहेत. त्यांचे सुमारे वीस वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. लग्नानंतर झीने दांपत्याला सहा मुली आणि एक मुलगा आहे तर अशा झीने यांचा प्रियकर रेवगाव येथील रुपेश योहानराव शिंदे याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अशी एकूण दहा मुले आता रस्त्यावर आली आहे.दरम्यान आशा आणि रुपेश शिंदे यांचे मागील एक वर्षापासून प्रेम संबंध होते. रुपेश शिंदे हा मोलमजुरी करून बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करत असे.

असा बळावला पोलिसांचा संशय, प्रमोद झीने याच्याकडे स्वतः पाळलेला कुत्रा आहे. या रस्त्यावरून वर्दळ कमी असल्यामुळे हा कुत्रा घराचे रक्षण करत होता. आणि मध्यरात्री नंतर रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांवर भुंकत होता .ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी हा कुत्रा भुंकलाच नाही. त्यामुळे परिसरातील लोकांना काय घडत आहे याचा अंदाजच आला नाही. त्यामुळे हा खून या कुत्र्याच्या ओळखीच्या कोणीतरी व्यक्तीनेच केला असावा असा पोलिसांनी अंदाज लावला आणि त्या दिशेने तपास सुरू केला. तसेच पोलिसांचे श्वान पथकही प्रमोद झीने याच्या घराजवळून फिरून पुन्हा घरीच आले. त्यामुळे घरचाच कोणीतरी व्यक्ती आहे याला पुष्टी मिळाली. प्राप्त माहितीनुसार अशा हिचा खून करण्यासाठी प्रमोद याने अशाला धमकी दिली होती, आणि तलवारीला धार लावूनही ती घरात आणून ठेवली होती. परंतु प्रमोद हा मद्य प्राशन करून रात्री अंगणात झोपलेला असल्यामुळे त्याचा झोपेतच खून करण्यासाठी अशाला सोपे गेले. खून केल्यानंतर तिने आपला प्रियकर रुपेश योहानराव शिंदे राहणार रेवगाव, तालुका जालना याला बोलावून घेतले आणि खून करण्यासाठी वापरलेले साहित्य तसेच प्रमोद याच्या हातातील कडे आणि गळ्यातील काही ऐवज रुपेश शिंदे यांच्याकडे सोपवला. खुणासाठी वापरलेल्या या साहित्याचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये हे स्वतः करीत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या टीमने तपास लावल्यानंतर पुढील तपास आता तालुका पोलीस करीत आहेत.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button