Jalna Districtजालना जिल्हा

जिल्हाधिकारीही म्हणाले हिप-हिप हुर्रे…..

जालना- जालनेकरांना सध्या श्रमदानाचे याड लागलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ऋतू कोणताही असो जालनेकरांच्या श्रमदान हे ठरलेलंच! कुंडलिका सीना नदीच्या स्वच्छता आणि वृक्षारोपणानंतर पारसी टेकडीवर वृक्षारोपण झालं आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर जालनेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगेबाबा म्हणजेच घाणेवाडी येथील जलाशयाची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. अर्थात हे सर्व जालनेकरांच्या श्रमदानातून.जालनेकरांच्या खांद्याला खांदा लावून अधिकारी देखील झटत आहेत मग ते जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड असो अथवा जालना पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर असो. स्वतःहून या सार्वजनिक श्रमदानाच्या कार्यात वाहून घेत आहेत.

नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथे संत गाडगेबाबा जलाशयाच्या संरक्षण भिंतीवर विविध प्रकारची काटेरी झुडपे आणि झाडे वाढलेली आहेत. या झाडांमुळे संरक्षण भिंतीला धोका पोहोचू शकतो आणि ती झाडे नष्ट करावीत अशी मागणी दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक संस्थांनी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता स्वतःहून जालनेकर या उपक्रमासाठी झटत आहेत. त्याला प्रशासकीय यंत्रणा देखील पाठिंबा देत आहे मागील रविवारी आणि आज दिनांक 14 मे रोजी अशा एकूण दोन रविवारी जालना शहरातील विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र येत तलावाच्या संरक्षण भिंतीची स्वच्छता मोहीम पार पाडली. दोन रविवारी तलावाच्या एका बाजूची स्वच्छता झाली आहे आणि पुढील दोन रविवारी तलावाच्या दुसऱ्या बाजूची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. जालनेकरांच्या या हाकेला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः श्रमदान करत हिप हिप हुर्रे….. म्हटलं आहे .

या आहेत सहभागी संस्था

● घाणेवाडी जलसंरक्षण मंच● समस्त महाजन,● आनंद नगरी सेवाभावी संस्था● जालना जिल्हा व्यापारी महासंघ● जालना मशिनरी डिलर्स असोसिएशन● स्वामी समर्थ पर्यावरण प्रकृती विभाग● KD फिटनेस● १०० शिक्षक क्लब ऑफ जालना● रेनील फाऊंडेशन● इंडियन मेडिकल असोसिएशन● आर्ट ऑफ लिव्हिंग● क्रेडाई जालना● सृष्टी फाउंडेशन● रोटरी क्लब ऑफ जालना● रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रल● जय हिंद अकॅडमी● लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट्स सिटी● अग्र युनिक जालना● फदाट सर’s सायन्स क्लासेस● पाझर सेवाभावी संस्था जालना● जालना शहर माहेश्वरी समाज● FAB रनर्स ग्रुप●100 ₹ सोशल क्लब.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button