“तो” नवरदेव हरवला कुठे? पोलीस घेत आहेत शोध
जालना- तीस वर्षीय विधवा महिला सोबत 24 वर्षीय तरुणाने लग्नाचे केलेले नाटक केल्याची शक्यता वर्तविली जात आहे,या महिला सोबत फिरून आल्या नंतर आता खरोखरच लग्न करावे लागते की काय? या भीतीने हा उतावीळ नवरदेव हरवला आहे. या संदर्भात त्याच्या भावी पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात नवरा हरवल्याची तक्रार दिली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिला ही भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील रहिवाशी असून तिचे 2008 साली राजू रामराव सपकाळ यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना अकरा वर्षाचा रोहित, सात वर्षाचा सार्थक, आणि पाच वर्षाचा श्लोक अशी तीन अपत्य आहेत. त्यांच्या पतीचे म्हणजेच राजू सपकाळ यांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे दोन मुले सासू-सासराकडे राहतात आणि एक मुलगा या महिलेजवळ राहतो. दरम्यानच्या काळात ही महिला कामाच्या शोधत जालन्यात आल्या नंतर येथील योगेश नगर भागात राहणाऱ्या गणेश कृष्णा मोरे यांच्यासोबत महिनाभरापूर्वी ओळख झाली. आणि त्यांनी भोकरदन येथील न्यायालयात विवाह करण्यासाठी शपथपत्र दाखल केले. आणि न्यायालयासमोरच असलेल्या महादेव मंदिरात लग्नही लावून घेतले .त्यानंतर हे दोघेजण जालना येथील संजय नगर भागामध्ये एक खोली भाड्याने घेऊन राहू लागले. दिनांक सात मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाण्याचा जार भरून आणतो म्हणून गणेश मोरे वय 24 वर्ष हा घरातून निघून गेला तो परत आलाच नाही .त्यामुळे या प्रकरणातील तक्रारदार तथा गणेश कृष्णा मोरे याच्यासोबत विवाह केला असल्याचे सांगणारी महिला सविता गणेश मोरे वय तीस वर्ष राहणार संजय नगर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात गणेश कृष्णा मोरे हरवल्याची तक्रार दि.7 मे ला नोंदविली आहे.
दुसरीकडे गणेश कृष्णा मोरे याची आई राधा कृष्णा मोरे व 39 वर्ष व्यवसाय, घरकाम राहणार योगेश नगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गणेश घरी न सांगताच निघून गेला. त्याचा इतरत्र शोध घेत असताना तो जेजुरी येथील बस स्टँड समोर असलेल्या लॉजवर भेटला. त्याच्यासोबत सविता राजू सपकाळ व तिचा एक पाच वर्षाचा मुलगा असे तिघेजण होते. त्यानंतर या तिघांना जेजुरी येथून जालन्यात आणले आणि तालुका पोलीस ठाण्यात हजर केले त्यावेळी गणेशने सांगितले की आपण सविता सोबत लग्न करणार आहोत. त्यामुळे हे तिघेही तेथून निघून गेले आणि त्यानंतर सविताने तिचा बुलढाणा येथे राहणारा भाऊ संदीप साहेबराव चांडोल याचे गणेशच्या आईसोबत मोबाईल वरून बोलणे करून दिले. त्यावेळी संदीपने त्याच्या बहिणीला पूर्वीच्या पतीपासून तीन अपत्य असल्याचे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचेही गणेशाच्या आईला सांगितले ,असे असतानाही गणेश मोरे हा तिच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचेही सांगितले. तरी पण आपण सर्वजण एकत्र बसून आणि पुढील दिशा ठरवू असेही सांगितले. परंतु त्यानंतर संदीप चांडोल आलेच नाहीत. तेव्हापासून गणेश मोरे हा कुठे गेला आहे त्याचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. त्यामुळे गणेश मोरे याला सविता राजू सपकाळ, तिचा भाऊ संदीप साहेबराव चंडोल, व सविताच्या ओळखीचा सोमीनाथ विठ्ठल इंगळे राहणार, योगेश नगर या तिघांच्या नावाची सुसाईड नोट राधा कृष्णा मोरे यांच्या व्हाट्सअप ला गणेश मोरे याने लिहून ठेवली होती. त्यामुळे गणेश कृष्णा मोरे हा बेपत्ता होण्यामागे वरील तिघांचाच हात असल्याची शक्यता गणेशाच्या आईने वर्तवली आहे. या संदर्भात कदीम जालना द पोलीस ठाण्यात दि.11 मे ला जवाबही दिला आहे.
दरम्यान 24 वर्षीय गणेश कृष्णा मोरे याने भोकरदन येथे विवाह केला असला तरी पुढील सर्व कायदेशीर बाबी पक्क्या करण्यासाठी सविता राजू सपकाळ उर्फ सविता गणेश मोरे यांनी भोकरदन न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये शपथपत्र दाखल केले होते. कदाचित हा विवाह पक्का करायचा नसेल म्हणूनच गणेश मोरे हा गायब झाला असावा असाही पोलिसांचा कयास आहे. एकीकडे गणेश मोरे यांच्या भावी पत्नी सविता गणेश मोरे यांनी नवरा हरवल्याची तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे गणेश मोरे यांच्या आई वडिलांनी, सविता मोरे आणि त्यांच्या साथीदारांनी गणेशला बेपत्ता केला असल्याचेही म्हटले आहे .या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राहुल जोंधळे हे करीत आहेत .
राजू मोरे यांचे वर्णन रंग गोरा ,उंची पाच फूट सहा इंच, अंगात काळा रंगाची पॅन्ट, सोनेरी रंगाचा शर्ट, डाव्या हाताच्या पंजावर आई-बाबा असे गोंदवलेले आणि मराठी हिंदी भाषा अवगत अशा वर्णनाचा व्यक्ती कोणाला आढळल्यास कदिम जालना पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com