उष्माघाताच्या रुग्णांसाठी सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष
जालना -दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि त्यापासून वाढणारा उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाच्या वतीने विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे, आणि यामुळे उष्माघात हा घातक आजार बळवण्याची शक्यता शासनाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे .या संदर्भात माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी सांगितले की उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, उन्हामध्ये बाहेर पडू नये आणि पडलात तरी पूर्ण शरीर झाकून कसे राहील याची काळजी घ्यावी. यानंतरही उष्माघात झालाच तर सामान्य रुग्णालयामध्ये अशा रुग्णांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिथे वातानुकूलित यंत्रणा सक्रिय केलेली आहे. पुरुषांसाठी चार तर महिलांसाठी तीन अशा एकूण सात खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आवश्यकता पडल्यास रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com