Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

GDCC प्रकरण; किरण खरात यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा तीन दिवसांची वाढ

जालना- फक्त जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजत असलेल्या GDCC म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन प्रकरणातील प्रमुख आरोपी किरण खरात यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा एकदा तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिनांक 18 पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवले जाणार आहे.


जानेवारीपासून फरार असलेले किरण खरात यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता मात्र जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे अर्ज फेटाळून लावल्यानंतर दिनांक 6 मे रोजी किरण खरात हे पोलिसांना शरण आले होते . आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सहा तारखेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी होती, म्हणजे ती दहा तारखेपर्यंत होती दहा तारखेला पुन्हा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि आज दिनांक 15 रोजी पुन्हा एकदा न्यायालयाने पोलिसांच्या मागणीनुसार तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे किरण खरात यांच्या पोलीस कोठडीत आत्तापर्यंत दोन वेळा वाढ करण्यात आली आहे.


का वाढली पोलीस कोठडी?
पोलिस आणि वकिलांनी केलेल्या युक्तिवादामध्ये पोलिसांच्या बाजूने बाजू मांडताना प्रभारी सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी आरोपीकडून आणखी बरीच माहिती गोळा करणे बाकी आहे त्यामुळे पोलीस कोठडीत वाढ करावी अशी मागणी केली. तपासीक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी न्यायालयाला सांगितले की सन 2021- 22 मध्ये किरण खरात यांच्या खात्यावर करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच किरण खरात यांच्याकडून मर्सिडीज कंपनीचे एक चार चाकी वाहन जप्त करणे बाकी आहे. ज्याची नव्या वाहनाची किंमत एक कोटी तीस लाख आहे परंतु हे जुने वाहन असल्यामुळे सुमारे 90 लाख रुपयांची किंमत आहे. खरात यांच्या म्हणण्यानुसार हे वाहन जरी विकले असले तरी पोलिसांनी तपास केल्यानंतर हे वाहन दुरुस्तीसाठी कंपनी शोरूम ला गेले होते आणि तेथून ते दुरुस्त करून आले. परंतु अद्याप पर्यंत ते विकल्या गेले नाही.आणि हे वाहन पोलिसांच्या हातीही लागलेले नाही. त्यामुळे हे वाहन जप्त करणे देखील बाकी आहे ,तसेच फसवणूक झाल्या प्रकरणी आणखी साक्षीदार वाढण्याची ही शक्यता पोलिसांनी व्यक्त केल्यामुळे न्यायालयाने किरण खरात यांच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवसाची वाढ करत असल्याचे आदेश आदेश जारी केले.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button