Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

वीस तारखेला रोजगार मेळावा! नोंदणी केली का?

जालना- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्फत शनिवार, दि. 20 मे 2023, रोजी भोकरदन येथील    मोरेश्वर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय   येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत  “पंडित  दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा”  आयोजित करण्यात  आला आहे. यासाठी 1 हजार 816 रिक्तपदे उपलब्ध झाली आहेत.

  रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार  उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या  दृष्टीने हा  रोजगार मेळावा आयोजीत करण्यात येत आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व  नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी मुलाखतीचे तंत्र याबाबत करिअर मार्गदर्शन तज्ञ समुपदेशकांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगाराबाबत अर्थसहाय्य करणा-या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाअंतर्गत विनामुल्य असलेले विविध रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.

या संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी कीमान पाच  प्रतीत बायोडाटा  फोटोआणि आधारकार्डसेवायोजन नोंदणी कार्ड, इ.  कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे. नोकरी इच्छुक उमेदवारानी अद्यापर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतसथळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्या वरील रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लय करुन लॉगीन करावे  आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित राहवे. अधिक माहितीसाठी  https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखालील जालना जिल्हा निवडून JALNA DIST JOB FAIR-1 (2023-24) यामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्या सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा.या मेळाव्याचा जास्तीत जास्त नोकरीइच्छूक  उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना) संपत चाटे  मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.भगवान डोंगरे यांनी केले आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button