“त्या” चार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ!
जालना- नियमबाह्य वैयक्तिक मान्यता प्रदान केल्याचा ठपका ठेवून जालना जिल्हा परिषदेचे तत्कालीन(सन 1996 ते 2001) माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.बी.गवळी, पी.जे.बाविस्कर, बी.इ.वसावे आणि निधन झालेल्या श्रीमती सुशीला चत्रेकर या चारही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा, यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राला कदिम जालना पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे. शासकीय कर्मचारी शासकीय अधिकाऱ्यांना मदत करत नसल्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. दिनांक दोन मे रोजी गुन्हा नोंद करण्याचे पत्र कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाण्यात दिले आहे अद्याप पर्यंत हा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे शाळेच्या या प्रकरणात काही “शाळा” सुरू आहे का? याचा संशय बळवल्या जात आहे.
गोदावरी शिक्षण संस्था गोंदी ,तालुका अंबड जिल्हा जालना संचलित पराडा आणि जालना येथे नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरक्षण धोरणाचे पालन न करता वैयक्तिक मान्यता दिली आहे. या संदर्भात शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी सुनावणी घेतली होती आणि या सुनावणी दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद जालनाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे यांना गुन्हे दाखल करण्यासाठी आदेशित केले होते. या आदेशामध्ये म्हटले आहे की “संस्थेकडे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र नसताना तसेच बिंदू नामावली नसताना संस्थेने आरक्षण धोरणानुसार नियुक्ती केलेल्या नसताना संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस वैयक्तिक मान्यता प्रदान करणे आदीप्रकरणी त्या- त्या कालावधी मधील संबंधित तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर श्रीमती मंगल गायकवाड- धुपे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांनी गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल पंधरा दिवसात या कार्यालयास सादर करावा.”अशा स्पष्ट सूचना आणि आदेश आहेत त्यामुळे श्रीमती धुपे यांनी दिनांक 2 मे रोजीकदीम जालना पोलीस ठाण्याला पत्र देऊन गुन्हा नोंद करण्यासाठी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी याची चौकशी करून गुन्हा नोंद करू असा निरोप श्रीमती तुपे यांना दिला आहे मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे दिनांक 24 पासून पंधरा दिवसांची मुदत दिलेली असताना एक महिना होत आला मात्र अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पोलिसांना दिलेल्या पत्राला कदीम जालना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली का काय ?किंवा या शाळेच्या प्रकरणांमध्ये काही “शाळा” सुरू आहे की काय असाही प्रश्न आता चर्चेला येत आहे.
वरील वस्तू स्थितीनुसार या कार्यालयाने तत्कालीन शिक्षणाधिकारी बी.इ.वसावे सेवानिवृत्त व पी.जी.बावस्कर सेवानिवृत्त, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांना वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्य यावरील असणाऱ्या स्वाक्षरी बाबत अभिप्राय मागवले होते पी.जी बावस्कर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी वरील आदेशांवर केलेल्या स्वाक्षऱ्या माझ्याच असल्याचे मान्य केले आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी बी.ई.वसावे यांनी मात्र अद्याप पर्यंत या स्वाक्षऱ्यांबाबत त्यांचा अभिप्राय कळवलेला नाही.एवढी सर्व कागदपत्रे कदीम जालना पोलीस ठाण्यात दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com