महानगरपालिका झाल्यावर जालन्याचे काय होईल?
जालना -जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडत पडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. खरंतर यापूर्वी पालिकेची हद्द वाढवायची किंवा नाही ?या मूळ विषयावर हा प्रश्न प्रलंबित होता. कारण हद्द वाढवली तर परिसरातील ग्रामपंचायत मधील वस्त्या/खेड्याच्या कांही भाग जालना शहराच्या हद्दीमध्ये आला असता आणि पर्यायाने याचा राजकारणावर परिणाम झाला असता. कारण ग्रामीण भागातील मतदार हे शहरी भागात आले असते आणि याचा अप्रत्यक्ष फायदा नगरसेवक आणि महापौर यांना झाला असता. याउलट ग्रामीण भागातील मतदार कमी झाल्यामुळे आमदारांना याचा फटका बसला असता .त्यामुळेच की काय? गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि शेवटी आता हद्द न वाढवताच जालना नगरपालिका महानगरपालिकेत रुपांतरीत होत आहे. महानगर पालिकेत रूपांतर झाल्यानंतर काय सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतील याविषयी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
तूर्तासतरी महानगरपालिका झाल्यानंतर विकास होईल असे सांगितले जात असले तरी या गोष्टीसाठी बरीच वर्षे खर्ची घालावी लागणार आहेत, कारण हा प्रशासकीय भाग आहे.आणि आपण अजून “ड”मध्ये आहोत. परंतु नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालनेकरांना महानगरपालिकेबाबत “असून अडचण, नसून कोळंबा”, असे म्हणण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा.
आजच्या या प्रतिक्रियांमध्ये माजी नगरसेवक तथा भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, ओम हॉस्पिटलचे डॉ. रितेश अग्रवाल, कपडा व्यावसायिक मनीषा उबाळे ,कंत्राटदार फिलिप उगले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. शोभा मोजेस यांच्या प्रतिक्रिया आहेत.
दिलीप पोहनेरकर,9422219172
,www.edtvjalna.com,