झाल्या एकदाच्या! वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या;जालन्यात कोण आले कोण गेले?
जालना-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश काल दिनांक 22 मे 2023 रोजी जारी केले आहेत. शासनाचे अवर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी हे आदेश जारी केले.या आदेशानुसार जालना जिल्ह्यात येणारे आणि जालना जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे.
पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त( निशस्त्र) या संवर्गातील बदलीने पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज बाजीराव राजगुरू हे आता बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी असणार आहेत. कन्नड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद व्यंकटराव आघाव हे जालना जिल्ह्यातील अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदलून येत आहेत. जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपाधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुनील जायभाये यांची बृहन्मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बापू सांगळे हे जालना शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदलून येत आहेत.जालना जिल्ह्यातील अंबड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील हे अहमदनगर ग्रामीण मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदलून जात आहेत. परतुर चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू धोंडीराम मोरे यांना सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बदलीने पदस्थापना झालेल्यांमध्ये संभाजीनगर गट क्रमांक 14 चे सहाय्यक समादेशक राज्य राखीव पोलीस बलाचे भगवान पांडुरंग भोटकर हे जालना येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन मध्ये सहाय्यक समादेशक म्हणून बदलून येत आहेत.
पदोन्नतीने पदस्थापना मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) या संवर्गातील पदावर सेवा जेष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात आणि पुढील अटींवर पदोन्नती देण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सुरेश सावळाराव बुधवंत यांना उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर म्हणून पदोन्नती देऊन पदस्थापना करण्यात आली आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com