पुणे -मेहकर बसला सिंदखेडराजा जवळ अपघात; सहा ठार 22 जखमी
जालना- पुणे येथून मेहकर कडे जाणाऱ्या पुणे- मेहकर या बसला आज दिनांक 23 रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जालना येथील सामान्य रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे तर काही रुग्णांना दुसर बीड येथेही रवाना करण्यात आले आहे.
मेहकर आगाराची बस क्रमांक एम एच 40 5802 ही रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पुणे येथून निघाली होती. दरम्यान सिंदखेड राजा जवळ एका कंटेनर सोबत हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये ठार झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे, राजू तुकाराम कुलाल वय 42 वर्ष राहणार वडगाव तेजन तालुका लोणार जिल्हा बुलढाणा( हे बस चालक आहेत), सौ. वर्षा रामदास खिल्लारे व 45 वर्ष राहणार केळवद तालुका चिखली जिल्हा बुलढाणा, वर्णमाला किशोर पवार वय 30 वर्ष राहणार बेळगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ,सीमा सोमेश्वर जोशी वय पन्नास वर्षे राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा आणि ट्रक चालक यांचा समावेश आहे .
जखमींमध्ये शेषराव उत्तमराव खराबे वय 60 वर्ष राहणार संत्री देशमुख, साहेब बबन 65 वर्ष राहणार सिंदखेडराजा, कुमारी गायत्री दिनकर तहकीक वय पंधरा वर्षे राहणार अँत्री देशमुख ,सुचित वसंतराव वाघ राहणार दुसर बीड तालुका सिंदखेड राजा, वैष्णवी सूचित वाघ राहणार दुसर बीड, ओम सुचित वाघ, जया मंगल पाटोळे राहणार जाधव वाडी तालुका चिखली, श्वेता संजय पाटोळे ,उल्हास विष्णुदास दुबे वय 40 वर्ष बालागिरी झारखंड, अगस्ती अनिल माने वय बारा वर्षे राहणार मेहकर, लिलाबाई यादव माने वय 77 वर्ष राहणार मेहकर, अनिल दिगंबर चव्हाण वय 48 वर्ष राहणार लव्हाळा तालुका मेहकर, वत्सलाबाई मोहन चव्हाण व पन्नास वर्ष कंका तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ,मंजुळा विशाल शिर्के व 25 कनगाव बुद्रुक तालुका मेहकर, प्रल्हाद देशमुख राहणार दुसर बीड जिल्हा बुलढाणा, विकास व्यवहारे राहणार मेहकर, योगेश सदाशिव झुंबडे व तीस वर्षे राहणार धाड तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, राहुल भीमराव मोरे वय 35 राहणार अंतरी देशमुख, अखिलेश सुभाष ठाकरके वय 25 वर्ष राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा, अर्चना अखिलेश ठाकरके वय 23 राहणार बुलढाणा, हर्षदा संजय वाटोळे राहणार जाधववाडी तालुका चिखली यांचा जखमीमध्ये समावेश आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com