आरोपी व फिर्यादीचे साटे-लोटे !फिर्यादी पडला पोलिसाला भारी!
जालना -सर्वसामान्यांना लाचेची मागणी करत विनाकारण पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्रास देणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत माधवराव केंद्रे वय 53 या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार दिनांक 25 रोजी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” या म्हणीनुसार सूर्यकांत केंद्रे यांच्याकडे पाटोदा विडोळी आणि काही गावांची बीट हवालदार म्हणून जबाबदारी दिली होती. वयामानानुसार मंठा पोलीस ठाण्याच्या जवळपासच ही गावे दिली होती. त्यामुळे सूर्यकांत केंद्रे हे या परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठांना याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी डिसेंबर मध्येच सूर्यकांत केंद्रे बदली करावी असा प्रस्ताव देखील वरिष्ठांकडे पाठविला होता असे समजते. त्या अनुषंगाने सध्या सूर्यकांत केंद्रे हे सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी दिनांक सात डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या प्रकरणातील तक्रारदाराला तुझा भाऊ आणि तू चोरून देशी दारू विक्री करतात ,त्यामुळे मासिक दोन हजार रुपये हप्ता आणि दर महिन्याला एक केस द्यावी लागेल अशी मागणी पंचा समक्ष केली.आणि मागील तीन महिन्याचे सहा हजार रुपये मागितले.खरंतर फिर्यादी हा त्याच्या पत्नीवर असलेल्या दाखल गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी गेला होता. परंतु त्यालाच लाचेची मागणी करण्यात आली. दरम्यान तडजोडीअंती हा प्रकार पाच हजार रुपयांवर ठरला. या सर्व प्रकरणाची शहानिशा औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी केली, आणि दिनांक 25 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मंठा पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत माधवराव केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्याही अनेक तक्रारी. दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार हा पाटोदा परिसरातून वाळूचा अवैध उपसा करत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्यावर सेलू आणि परभणी येथे देखील ट्रॅक्टर पळविण्यासंदर्भात तक्रारी आल्याचेही समजते.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com