Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

लॉयन्स क्लबच्या नेत्रसेवा व्हॅनचे लोकार्पण ;गल्लीबोळात मिळणार मोफत सुविधा

जालना-लॉयन्स क्लब ऑफ जालनाच्या वतीने फिरत्या नेत्रचिकित्सालयाच्या व्हॅन चे लोकार्पण गुरुवार दिनांक 25 रोजी करण्यात आले.
या व्हॅनमुळे आता विविध कंपन्या, कॉलनी, ग्रामीण भाग आणि कामगार वस्तींमध्ये गरजूंना डोळ्याविषयींच्या विकारांवर औषधोपचार मिळणार आहेत, एवढेच नव्हे तर गरज पडली तर लॉयन्स क्लबच्या वतीने त्यांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. या क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण झाले.

या नेत्रचिकितचा व्हॅनच्या उद्देशाबद्दल बोलताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पुरुषोत्तम जयपुरिया यांनी सांगितले की, मराठवाड्यामध्ये नांदेड, उदगीर, परतुर आणि चिखलठाणा या ठिकाणी लायन्स क्लब ची नेत्र रुग्णालय आहेत.जालना जिल्ह्यात परतुर येथे लायन्स क्लबच्या वतीने नेत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. आणि त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 22 लाखांचा हा प्रकल्प आहे त्यामध्ये नेत्र तपासणी व्हॅन, नागरिकांनी एकत्र येऊन बोलावल्यानंतर शंभर -दोनशे समूहामध्ये जाऊन त्यांची तपासणी करणार आहे. कंपनी कामगार, सामान्य नागरिक, ग्रामीण भागातील जनता या सर्वांना ही मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 22 लाखांच्या या प्रकल्पामध्ये परतुर येथे भव्य हॉस्पिटल तसेच व्हॅन आणि यासाठी लागणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .ज्यामध्ये एक चालक, एक जनसंपर्क अधिकारी, दोन तांत्रिक सहाय्यक आणि एक नेत्र तज्ञ यांचा समावेश आहे. रुग्ण तपासणीनंतर जर संबंधित रुग्णाची शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यापासून परत आणून सोडण्यापर्यंत पूर्ण खर्च मोफत केल्या जाणार आहे. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी आणि संबंधित व्हॅनला आपल्या समूहामध्ये बोलावण्यासाठी लायन्स क्लबचे पदाधिकारी अरुण मित्तल यांच्याशी 94 22215551 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहनही पुरुषोत्तम जयपुरिया यांनी केले आहे.

व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्याला चिकलठाणा येथील पदाधिकारी राजपाल यादव यांच्यासह सर्वश्री लॉयन राजेश भुतिया, राधेश्याम तिबडेवाल, गिरीश पाकणीकर, अरुण मित्तल, राजेश कामड, सुभाष देविदान, अमोल बांगड, ललित बीजावत ,अतुल लड्डा, कमल झुणझुणवाला, कमल बगडिया, चंद्रकांत दाभाडे आदींची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button