Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सोमवार-मंगळवार रेल्वे गाड्यांच्या मार्गामध्ये बदल

जालना-भुसावळ विभाग, मध्य रेल्वे मधील जळगांव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर दिनांक 29 मे ला दुपारी 15.30 ते 30 मे ला दुपारी 15.30 वाजे पर्यंत 3 र्‍या लाइनसाठी यार्ड रीमॉडेलिंगच्या प्री-NI आणि नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 24 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे, यामुळे नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुढील गाड्या अकोला मार्गे वळविण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे

1) दिनांक 30 मे रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12753 नांदेड — हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्कक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगांव, भुसावळ मार्गे न धावता हिंगोली, अकोला , मलकापुर, भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.

2) दिनांक 29 मे रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 नांदेड — अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगांव, भुसावळ मार्गे न धावता हिंगोली, अकोला, मलकापुर, भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.3) दिनांक 30 मे रोजी अमृतसर येथून सुटणारी गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस, भुसावळ स्टेशन,जळगांव, चाळीसगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे न धावता भुसावळ बायपास लाईन, मलकापुर, अकोला, हिंगोली मार्गे धावेल.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button