नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी हजर, 3 वर्षांपासून सुरू असलेल्या “कार्यक्रमांना” आळा बसेल?;यांना मिळाला पहिला सॅल्यूट
जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोषी, यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला. पुणे येथे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती.ते आता जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत झाले आहेत.
दरम्यान मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी आज सकाळीच त्यांचा पदभार सोडला होता. नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे स्वागत अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पहिला सॅल्यूट मिळविण्याचा मान पोलीस उपनिरीक्षक के.जी. चित्राल आणि त्यांचे सहकारी अमोल घोडके यांना मिळाला आहे. पदभार घेण्याचे शासकीय सोपस्कार झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी श्री. दोषी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि प्रथेप्रमाणे काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचा आजचा पहिला दिवस पार पडला.
उद्यापासून जालनेकरांना दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या दोषी यांचा कारभार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मागील तीन वर्षात सुरू असलेले “कार्यक्रम” तसेच पुढे चालू राहतील का? का बदल पाहायला मिळतील हे लवकरच समजणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com