Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन : भारतात 15 कोटी जनता तंबाखूची व्यसनाधीन

जालना-( डॉ. सुरज सेठीया )जगात तंबाखूच्या सेवनाने दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात हे प्रमाण 10 लाख एवढे असून, आत्महत्या, दारूमुळे मरणाऱ्यांपेक्षा तंबाखूच्या सेवनाने मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येतो. तंबाखू सेवनाविरुद्ध जागतिक आरोग्य संघटनेच्या मोहिमेचे यावर्षीचे घोषवाक्य “आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे” असे असून, तंबाखूची शेती करण्यापेक्षा जीवनासाठी आवश्यक अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतीची गरज आहे, असा मौलिक संदेश तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना या घोषवाक्यातून देण्यात आल्याची माहिती रुबी हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ञ डॉ. सुरज राजेश सेठीया यांनी दिली.


जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम विषद करताना डॉ. सुरज सेठीया म्हणाले की, 2016-17 मध्ये करण्यात आलेल्या ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार भारतात तंबाखूविरहित वापराचे प्रमाण 10.38 टक्के आणि धूररहित तंबाखूचा वापर 21.38 टक्के आहे. 28.6 टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन धूर किंवा धूररहित स्वरूपात करतात; ज्यात 42.4 टक्के पुरुष आणि 14.2 टक्के स्त्रिया आहेत. तंबाखूचे सेवन ते उत्पादन सर्वच मानव जातीसाठी अत्यंत घातक आहे. याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य “आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज” असे आहे. त्यातून तंबाखूऐवजी पर्यायी पीक उत्पादन आणि विपणनाच्या संधींबद्दल जागरुकता वाढवण्यासह शाश्वत, पौष्टिक पिके घेण्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबतचा संदेश देण्यात आला आहे. आजघडीला जग वाढते संघर्ष आणि युद्धे, हवामानातील धक्के आणि कोविड साथीच्या रोगाचे आर्थिक, सामाजिक परिणाम आदी समस्यांचा सामना करत आहे, त्यातच अन्न संकट ही भयावह समस्या म्हणून पुढे येत आहे. अशावेळी पिकांच्या अन्न संरचनात्मक कारणांवरही परिणाम होतो. तंबाखू सेवन व उत्पादन वाढीवर नजर टाकल्यास ही बाब अन्न असुरक्षिततेसाठी घातक सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे. जगभरातील सुमारे 3.5 दशलक्ष हेक्टर जमीन दरवर्षी तंबाखू पिकासाठी वापरली जात आहे. पाण्याचाही बेसुमार वापर केला जातो. तंबाखूसाठी दरवर्षी 2 लाख हेक्टर जंगलतोड होते. तंबाखू पिकासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके आणि खतांचा वापर होत असल्यामुळे मातीची उगवण क्षमता कमी होते. अशा जमिनीत अन्नधान्य पिकविण्याची क्षमता अत्यंत कमी होत चालली आहे. तंबाखू शेतीत नंतर घेतली जाणारी पिके आणि तेथील चारा अत्यंत विनाशकारी ठरतो. कारण तंबाखूच्या शेतजमिनी वाळवंटीकरणास अधिक प्रवण असतात. नगदी पीक म्हणून तंबाखूकडे पाहिले जात असलेतरी त्यातून मिळणारा नफा हा कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये शाश्वत अन्न उत्पादनासाठी होणारे नुकसान भरून काढू शकणारा नसतो. ही बाब विचारात घेता तंबाखूचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन वेळीच रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची आणि शेतकऱ्यांना पर्यायी अन्न पिकांच्या उत्पादनात मदत करण्याची नितांत गरज असल्याचे डॉ. सेठीया म्हणाले. आपल्या आरोग्यासाठी अन्न आवश्यक आहे. निरोगी आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो, आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते, मानसिक आरोग्य सुधारते. संतुलित आहारामध्ये विविध फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबीचा समावेश होतो.दुर्दैवाने, तंबाखूचा वापर निरोगी खाण्याच्या सवयींमध्ये व्यत्यय आणू शकतो. धूम्रपान करणार्‍यांना अनेकदा चव आणि वासाची भावना कमी होते, ज्यामुळे त्यांच्या जेवणाच्या स्वादावर परिणाम होऊ शकतो. धुम्रपान भूक कमी करते, पोषक तत्वांच्या कमतरतेचा धोका वाढतो. शिवाय, धुम्रपानामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते आणि पाचक विकार होण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे तंबाखूपेक्षा पौष्टिक अन्नाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान आणि तंबाखू सेवन वर्ज्य करण्यामुळे व्यक्ती त्यांची स्वाद आणि वासाची भावना सुधारू शकतात, भूक वाढवू शकतात, पोषक तत्वांची कमतरता आणि पाचन विकारांचा धोका कमी करू शकतात. धूम्रपान सोडल्याने तंबाखूमुळे होणाऱ्या विकारावरील आर्थिक खर्चातून मुक्तता मिळवू शकतात, असे सांगून डॉ. सेठिया म्हणाले की, हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 12 टक्के मृत्यूंमध्ये तंबाखूचा वापर आणि धुम्रपान कारणीभूत असते. कारण ही बाब कार्डिओ व्हॅस्कुलर डिसीजचे दुसरे प्रमुख कारण आहे, उच्च रक्तदाब (ज्यामध्ये धूम्रपान देखील कारणीभूत असते) धूम्रपान करणार्‍यांसाठी अत्यंत धोकादायक सिद्ध होत आहे. धूम्रपान स्वतः करत नसला तरी धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासामुळेही धोका उद्भवतो. संपर्कातील व्यक्तीच्या धूम्रपानाच्या धुरामुळे वर्षाला 9 लाख लोक व्याधीग्रस्त बनतात. केवळ धूम्रपान करणाऱ्यांच्याच नव्हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या आणि प्रियजनांच्या आरोग्यावरही दूरगामी परिणाम होतो, हेदेखील हा मुद्दा देखील जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने अधोरेखित केल्याचे डॉ. सुरज सेठीया यांनी स्पष्ट केले.

****************************

तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम आणि ती सोडण्यासाठी उपाय-(महेंद्र वाघमारे,आरोग्य कर्मचारी)
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी, मनोरंजनासाठी, आनंदासाठी, दुःख दुर करण्याच्या समजुतीने आणी मित्राच्या आग्रहास्तव तंबाखु व तंबाखुजन्य वेगवेगळया पदार्थाचे जसे सिगरेट बीडी ओढने,गांजा,अफीम इत्यादी शरीरास हाणीकारक गोस्टीचे वारंवार सेवन करण्याची इच्छा निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आपन व्यसन असे म्हणतो.तसेच या वाईट व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना आपन व्यसनी व्यक्ती म्हणुन संबोधतो.मनावर नियंत्रण न ठेवता आमली पदार्थाच्या आहारी जाण्याच्या क्रीयेला व्यसनाधीनता म्हणताता ही व्यसनाधीनता आपल्या समाजाला लागलेली कीड आहे.
भारतात व महाराष्ट्रात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे ते जागतीक प्रोढ तंबाखु निरीक्षन २०१६-१७ (GATS-2) नुसार हे प्रमाण १५%ने कमी करने अपेक्षीत आहे.
जागतीक प्रोढ तंबाखु तिस-या टप्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे यात महाराष्ट्रातील शाळकरी वयोगटातील मुलां-मुलीमधील तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण चितांजनक बाब आहे.
Sustainable Development Goalst च्या धेयानुसार तंबाखु सेवनाचे सरासरी प्रमाण जे २५%ने कमी करण्याचा ऊद्देश आहे.सदर उद्देश्य साध्य करण्याकरीता १३ ते २० वर्षे वयोगटातील मुलां-मुलीमधे तंबाखुचे सेवण सुरू होऊ नये या करता विषेश ऊपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.जागतीक युवा तंबाखु सर्वेक्षण ४नुसार १३ ते १५ वयोगटातील सरासरी ३०%मुले ही स्वतःच्या राहत्याघरीच तंबाखु सेवण करतात त्यामुळे पालकामधे तंबाखु व्यसनाबद्दल अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे.विविव सामाजीक संस्थांशी करार करुन शाळा तंबाखुमुक्त करते गरजेचे आहे.
तंबाखु सेवनामुळे तोंड,स्वरयंत्र,फुफुस,गळा, अन्ननलिका,पोट,गर्भाषय,तसेच मुखाचा कर्करोग होऊ शकतो.तबांखु सेवनामुळे दरवर्षी सुमारे अडीच लक्ष लोकांना कर्करोगाचे निदान होत आहे.तसेच केस व तोंडाला दुर्गधी,हिरड्यांना इजा,दातावर काळे पिवळे डाग,श्वास घेण्यास त्रास असे धोके देखील होऊ शकतात.
अशा प्रकारचे व्यसन लागलेली व्यक्ती ही संभाव्य आजारपनाच्या धोक्यामधे जीवन व्यतीत करीत असते.व्यसन हे कोनत्याही,जातीचे,वर्गाचे,धर्माचे,पंथाचे,गरीब,श्रीमंतांचे तसेच मध्यमवर्गीयांचे होऊन राहत नाही.या व्यसनाच्या अतिरेकामुळे मानवी शरीराची, कुटुंबाची समाजाची व देशाची देखील हाणी होत आहे.जे जे मानवी जीव या पृथ्वीवर जन्मास आले त्यांच्या अन्न,वस्त्र,निवारा या अत्यावश्यक गरजेच्या पुर्ततेसाठी परिश्रम, बुद्धिचातुर्य,शिक्षण,सहनशिलता,आत्मविश्वास नौकरी ईत्यादी व्दारे केलेले प्रयत्न म्हणजे चांगले व्यसन होय.परंतु या अत्यावश्यक गरजा कधी कधी पुर्ण होत नाही त्यावेळेस व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाऊन अमली पदार्थाच्या सेवनास सुरुवात करते.
आजकाल तर वेगवेगळी ब्रन्ड ची तंबाखु बाजारत आली आहे,या कंपण्याची जाहीरात प्रसिद्ध सिने अभिनेते अभिनेत्री करून युवकांना व जनतेला या व्यसनाकडे आकषित करतांना दिसत आहे जणु *व्यसनांचे फॅशनची* घोंडदोड सुरू झाली आहे.चौकाचौका पान टपरी वर तंबाखु च्या सेवनाची रेलचेल सुरू आहे,रात्रभर अभ्यास व पार्टय्या च्या नावावर आपली मुले तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसनी तर होत नाहीत ना याकडे लक्ष देण्यात पालक कुठेतरी कभी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे,ग्रामीण भागातील स्थीती तर या पेक्षाही वाईट आहे,गावतील लहान मोठे सोबतच सहजपने तंबाखुजन्य पदार्थीचे सेवन करतांना दिसत आहेत.
आज आपन तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे धोके बाबत समाजामधे जनजागृती करण्यासाठी लोकांनी या व्यसनातुन मुक्त होण्यासाठी तंबाखु विरोनी दिन तथा जागतीक तंबाखु नकार दिवस राबवत आहोत.तंबाखु सेवन न करण्या बाबत कोटापा कायदा २००३ (Cigarettes and Other Tobacco Products Act) हा आहेच तसेच तंबाखु नियंत्रण समीत्या आहेत,कायद्यामधे शिक्षेची व आर्थीक दंडाची देखील तरदुद आहे तरी देखील तंबाखु सेवन नियंत्रण करण्यात अपेक्षीत यश प्राप्त झालेले दिसत नाही.या साठी जनतेमधे या बाबत परिवर्तन घडऊन आणने हा उत्तम पर्याय आहे यासाठी महाराष्ट्र शासन संकल्प आरोग्याचा तंबाखु मुक्त महाराष्ट्राचा या सदराखाली सातत्याने कार्यरत आहे व मे महिण्यात ४ आठवडे विविध स्तरावर जनेसाठी जनजागृती मोहित राबवीत आहे यात लोकांना तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनापासुन परावर्त करणे,तसेच तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे आजारी असलेल्या व्यक्तीचा शोध घेणे,निदान करणे व ऊपचार करणे बाबत कार्यवाही सुरू आहे.

१.तंबाखु एका झटक्यात सोडण्याचा संकल्प घ्यावा.
२.जर तंबाखु चे सेवन एका दिवसात सोडण्यास सक्षमता वाटत नसेल तर कमी-कमी करत देखील सोडु शकता.
३.जेव्हा तंबाखु खाण्याची इच्छा होईल तेव्हा तंबाखु न खाता ईतर एखादे आवडीचे चागंले काम करण्यात मन लावा.
४.तंबाखुजन्य पदार्थ जवळ बाळगु नका.
५.आपन जितका खर्च तंबाखुजन्य पदार्थ खान्यावर खर्च करता त्याची रक्कम एखाद्या डब्यात जमा करा,त्यामुळे आपनास अनुमान लागेल की आपला यावर किती खर्च होतो व आपनास हा वायफळ खर्च कमी करण्यास प्रेरणा मिळेल.
६.कॅफीन मुक्त पदार्थाचे सेवन टाळा.
७.पोषक आहार घ्यावा,नियमीत व्यायाम करावा.
८.आपल्या घरात तसेच कामाच्या ठिकानी तंबाखु निषेध असा फलक लावावा किंवा हाताने लिहावे.
९.आपल्या घरातील सदस्यांना व आपल्या मित्रांना सांगा की आपनास तंबाखुजन्य पदार्थ सोडण्याची जाणीव होत आहे.
१०.आपनास जाणीव असावी की आपल्या मनावर व शरिवावर आपले नियंत्रण आहे.
*जिवन निवडा तंबाखु नको*
विळख्यात व्यसनाच्या जिव जातो मानसाचा।
राक्षस होतो मानसाचा सुटता सुटेना जाळे।।
तंबाखु,मावा,गांजा,ओढतो सिगरेट बीडी।
जिवंतपणी का ओढुन घेतो मरणाची का सिडी।।
फॅशन म्हणुन व्यसन वाढते क्षणाक्षणाला।
सारखे रोग ओढुन कोन रोके मनाला।।
नषा ही जिवघेणी बघ संपवेल सृष्टी।
टाळ तंबाखु सेवण वेड्या हीच खरी दृष्टी।।******

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button