जातीचे प्रमाणपत्र पुढे पाठवायचे!द्या तीनशे रुपये! महसूल सहायकाला रंगात पकडले
भोकरदन- जातीचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपयांची लाच मागणाऱ्या महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. भोकरदन तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक श्रीकृष्ण अशोक बकाल ,वय 32 वर्ष ,राहणार शिंगणे नगर देऊळगाव राजा. यांनी या प्रकरणातील तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या भिल्ल तडवी जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदांची पूर्तता करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी ही लाच मागितली.
दरम्यान तक्रारदाराच्या चार नातेवाईकांची 1200 रुपये आणि यापूर्वी पुढे पाठवलेल्या आठ जातीच्या प्रमाणपत्रांची बाकी असलेली 2400 रुपये अशी एकूण तीन हजार सहाशे रुपयांची लाच श्रीकृष्ण बकाल यांनी तक्रारदाराकडे मागितली होती. परंतु तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदविली .त्या अनुषंगाने तहसील कार्यालयातून ऑनलाइन प्रमाणपत्राची पूर्तता करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी तडजोडीअंती ठरलेली 3000 रुपयांची लाच घेताना श्रीकृष्ण अशोक बकाल यांना रंगेहात पकडले आहे .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांनी हा सापळा रचला. या विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एस. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि तीन हजार रुपये जप्त केले आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com