Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ.करुणा मोरे,सौ.जनाबाई ढोकळे सन्मानीत

जालना -तालुक्यातील मौजपुरी येथे दि. 31 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मौजपुरी यांच्या वतीने गावातील कर्तबगार आणि सामाजिक कार्यात उल्लेखनिय काम करणार्‍या सौ.करुणा अच्युत मोरे आणि सौ.जनाबाई रामेश्वर ढोकळे या दोन महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे स्मृतीचिन्न, मानपत्र आणि 500 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच ज्योती राऊत, उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागवत राऊत, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंद्रीनारायण भसांडे, अच्युत मोरे, ग्रा.पं.सदस्य सतिश ढोकळे, राम जाधव, संतोष मोरे, विष्णु डोंगरे, बंडु काळे, नारायण गायकवाड, यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरीक सुधाकर ढोकळे, राजेश महाडिक, नारायण डोंगरे, सोनाभाऊ खडेकर, राम शेजुळ, बालाजी बळप, विष्णु गायकवाड, गणेश डोंगरे, रामदास गायकवाड, हरिकिशन मुळे, पांडुरंग नेमाने, कृष्णा हिवाळे, अंगणवाडी सेविका वैशाली शिंदे, शिवनंदा एखंडे, छाया मुळे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button