ऑलम्पिक कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा; जालन्यात क्रीडा प्रेमींचे धरणे आंदोलन
जालना- ऑलिंपिक कुस्तीपटू यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठीआज दि.2 जूनला सकाळी दहा वाजता जालना शहरातील खेळाडू, क्रीडा शिक्षक,क्रीडा संघटक व सर्व कुस्तीपटू पालक, क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक, सामाजिक संघटना व क्रीडा संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
भारतीय लोकशाहीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणाऱ्या जगविख्यात कुस्तीपटू सोबत झालेला गैरव्यवहार, गैर वर्तणूक याबद्दल सर्व क्रीडाप्रेमी यांनी निषेध नोंदवलेला . भारतासारख्या लोकशाही सार्वभौम संविधानिक देशांमध्ये अशी घटना घडणे हे फार वाईट आहे. अशी भावना जनमानसात निर्माण झाली असून या घटनेचा जालना शहरातील सर्व क्रीडाप्रेमी शिक्षक संघटक क्रीडा शिक्षक यांनी जाहीर निषेध केला .याप्रसंगी सुभाष देठे , जालना जिल्हा कुस्ती संघटनाचे अध्यक्ष पहेलवाण लक्ष्मणराव सुपारकर, गणेशराव सुपारकर, विविध जिल्हा क्रीडा संघटनेचे पदाधिकारी अरविंद देशमुख, साईनाथ चींनादोरे, फिरोज अली खान,जवाहर काबरा, शेख चाँद ,राजू थोरात ,शिवाजी शेळके, सुभाष कोळकर, प्रमोद खरात,बप्पासाहेब म्हस्के,प्रल्हाद वाघ,सचिन दोरखे,रविंद्र ढगे,सचिन मोहिते,संतोष मोरे , बळीराम पाटेकर, शिवाजीराव वरखडे ,संतोष नागवे, श्याम काबुलीवाले,रमेश थोरवे विजय गाडेकर,अश्विन चरभरे,शिवम शेळके,अश्विन आंबेकर, दत्ता पवार,रमेश थोरवे, याप्रसंगी खेळाडू क्रीडा प्रेमी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com