मोबाईल सापडले चोर गायब:4 लाखांचे मोबाईल तक्रारदारांना परत; सायबर शाखेचा तपास
जालना -विविध ठिकाणाहून चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास लावण्यात सायबर शाखेने आघाडी घेतली आहे, आणि सुमारे 3 लाख 93 हजार रुपयांचे 22 मोबाईल संबंधित तक्रारदारांना आज पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत, तसेच चार दिवसांपूर्वीच रमेश फुलमाम्डीकर यांच्या खात्यातून 32 हजार रुपये ऑनलाईन काढून घेण्यात आले होते .त्यापैकी 22 हजार रुपये परत मिळविण्यात सायबर शाखेला यश आल्यामुळे फुलमाम्डीकर यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांचा सत्कारही करण्यात आला. मोबाईल सापडले असले तरी चोर मात्र सापडले नाहीत.
दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गुगल वरून येणाऱ्या कोणत्याही लिंक ला क्लिक करू नये ,कारण ज्या ॲप गुगलला पैसे देतात त्या ॲपच्या लिंक गुगल सर्वप्रथम पाठविण्यासाठी प्राधान्य देते ,आणि त्यामधून असे धोके निर्माण होतात .संबंधित बँकेच्या शाखेमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्यावी आणि इतरांवर विश्वास ठेवुनये असे आवाहनही श्री.दोषी यांनी केले आहे.
सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे .गर्दीच्या ठिकाणी आणि बहुतांशी आठवडी बाजारांमधून हे मोबाईल चोरीला गेले होते. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. केंद्र शासनाच्या वतीने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या दोन पोर्टलच्या माध्यमातून या तक्रारी नोंदविल्या गेल्या आणि याचा तपास सायबर शाखेकडे आला .हा तपास करत असताना सायबर शाखेने संबंधित मोबाईल कुठे चालू आहेत याचा तपास लावला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे मोबाईल अनोळखी व्यक्तींनी पैशाची गरज सांगून कमी किमतीमध्ये विकल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मूळ चोर सायबर शाखेच्या हाती लागलेच नाहीत परंतु तीन लाख 93 हजार रुपयांचे 22 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आणि आज संबंधितांना ते दिले आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातून चोरलेले मोबाईल हे इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन कमी किमतीमध्ये विक्री केल्यामुळे घेणारे व्यक्ती हे प्रतिष्ठित आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसलेले असल्यामुळे त्यांच्याकडून मोबाईल आणलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने नकळत या चुका झाल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले .हा तपास करण्यासाठी सायबर शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कासोळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटोळे, यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण आडेप, किरण मोरे ,संदीप मोरे ,महिला पोलीस कर्मचारी श्रीमती चव्हाण आदींचा समावेश होता.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com