पर्यावरण दिनविशेष; 1000 पोलीस प्रशिक्षणार्थींनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ
जालना -येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रात 5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार व सामाजिक वनीकरण विभाग जालना,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती साठी पाेलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाेलीस प्रशिक्षण केंद्राचे उप प्राचार्य एम.एम खान हाेते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) प्रशांत वरुडे व भारतीय वन्यजीव संस्था (WII) पर्यावरण तज्ञ अजय गायकवाड,सागर चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी महा. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम,मधुकर गायकवाड जिल्हा प्रधान सचिव , शंकर बाेर्डे ,मनाेहर सराेदे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रारंभी उपस्थित एक हजार पाेलीस प्रशिक्षणार्थी यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. त्या नंतर सागर चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांची भूमिका या वर मार्गदर्शन केले.तर विभागीय वनअधिकारी प्रशांत वरुडे यांनी पाेलीस प्रशिक्षणार्थी यांना वर्दी ची सुंदरता राखत पर्यावरणाचे भान जाेपासावे असे आवाहन केले.
या प्रसंगी पाेलीस निरिक्षक श्री.सतिश जाधव यांनी पर्यावरण जनजागृती पर मार्गदर्शन केले. या प्रसंगी महा.अंनिसचे जिल्हाकार्याध्यक्ष श्री. गिराम यांनी साप आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. तर शंकर बाेर्डे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन चमत्कार प्रयोग सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुकर गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पाेलीस निरिक्षक सतीश जाधव यांनी मानले. पाेलीस निरिक्षक श्री.निमीश मेहेत्रे,श्री.विवेक पाटील,श्री.सतिश.गजानन कायंदे यांच्या सह.एम..व्ही. एस.संभाजी हटकर, श्री.बचाटे यांची उपस्थिती हाेती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com