शेततळ्यात बुडून सख्खी भावंडे आणि बापलेक अशा एकूण चौघांचा मृत्यू; सामनगाव वर शोककळा
जालना- जालना तालुक्यातील सामनगाव शिवारात असलेल्या एका शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा आणि बाप लेकाचा असा एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक सहा रोजी दुपारच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेमुळे सामनगाव वरच नव्हे तर परिसरातील गावावर देखील शोक काळा पसरली आहे. जालना शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर सामनगाव हे गाव आहे .या गावालगतच पडुळ यांचे शेततळे आहे. या शेततळ्यात पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास भागवत कृष्णा पडूळ वय नऊ वर्ष ,ओंकार कृष्णा पडूळ वय सात वर्ष ,आणि युवराज भागवत इंगळे वय सहा वर्ष हे पोहण्यासाठी गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे तीनही बालके शेततळ्यात पडल्यानंतर आरडा ओरड सुरू झाली तेथून जवळच युवराज इंगळे याचे वडील भागवत जगन्नाथ इंगळे वय 35 वर्षे, हे असल्यामुळे त्यांनी लगेच शेततळ्याकडे धाव घेतली आणि तळ्यात उतरून या बालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मुलांना वचवताना ते स्वतः देखील या तळ्यात बुडून मृत्यू पावले आहेत. दरम्यान शेततळ्यातील पाणी काढून देण्यासाठी एका बाजूने तळेही फोडण्यात आले परंतु तोपर्यंत मृतदेह हाती लागले होते .भागवत पडुळ यांना कृष्ण आणि ओंकार हे दोनच मुले होती. तर भागवत जगन्नाथ इंगळे हे पडुळ यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. त्यांना एकूण चार आपत्य होती त्यापैकी युवराज इंगळे हे एक आपत्य होते. दरम्यान तालुका पोलिसांनी आणि परिसरातील लोकांनी हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि उत्तरिय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com