1.
Jalna Districtजालना जिल्हा

मोटरसायकल-कारच्या अपघातात तांगडे दांपत्य ठार

घनसावंगी- जांब समर्थ येथील तांगडे दांपत्य मोटरसायकल वरून प्रवास करत होते. दरम्यानच्या काळात पाठीमागून येणाऱ्या कारणे धडक दिल्यामुळे या दोघांचा अपघात झाला आणि त्यामध्ये या दांपत्याचा मृत्यू झाला आहे.

आज दि 6 दुपारी एक वाजेच्या सुमारास घनसांवगी तालुक्यातील जांब समर्थ येथे राहणारे मधुकर भगवानराव तांगडे वय 60 वर्ष व त्यांची पत्नी लताबाई मधुकर तांगडे वय 55 वर्ष हे दोघे घनसावंगी , कुंभार पिंपळगाव कडून जांब समर्थ कडे मोटर सायकल वरून जात होते. यावेळी विरेगाव तांड्याजवळ आल्यानंतर कुंभार पिंपळगाव कडून आष्टी कडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.03 बी एच 2408 या कारणे पाठीमागून मोटरसायकलला जोरदार धडक दिली आणि तांगडे दाम्पत्य खाली पडले , मोटरसायकल वरील तांगडे दाम्पत्याच्या डोक्याला मार लागला आणि मधुकर तांगडे वय 60 वर्षे यांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे ,तर त्यांच्या पत्नी लताबाई तांगडे वय 55 यांना घनसांवगी येथील शासकीय रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच घनसांवगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्रे व पानकेंद्रे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली. घनसांवगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button