जालना पालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी निलंबित; पालिकेला बसला पंचवीस हजारांचा दंड
जालना- जालना नगरपालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी सुरेश सांगुळे यांना कामात हलगर्जी केल्याप्रकरणी जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिनांक 2 जून रोजी निलंबित केले आहे .त्यांच्या जागी पर्याय व्यवस्था म्हणून सहशिक्षक अशोक पवार यांना नियुक्त केले आहे.
माधुरी साने या सहशिक्षिकेची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे सुनावणी सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात वरिष्ठांनी प्रभारी शिक्षणाधिकारी तथा सहशिक्षक सुरेश सांगुळे यांना न्यायालया संदर्भात आणि एकूणच वरिष्ठ कार्यालयांनी विचारलेली माहिती देण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. परंतु चुकीचे उत्तरे देणे, उडवा उडवी चे उत्तर देणे, याचसोबत न्यायालयासमोर स्वतः हजर न होता निलंबित शिपाई संतोष अग्निहोत्री यांना पाठवून न्यायालयाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडील अतिसंवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता परस्पर मुंबई येथे स्वतः न जाता संतोष अग्निहोत्री निलंबित शिपाई कर्मचारी यांना पाठवणे ही गंभीर बाब असून, कार्यालयीन शिस्तीच्या विरुद्ध आहे. सुरेश सांगुळे यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केलेले नाही व सांगितलेली कामे देखील पार पाडली नाहीत. त्यामुळे ते प्रथम दर्शनी दोषी दिसून येत आहेत, तसेच निलंबित कर्मचारी अग्निहोत्री यांना राज्य मानवी हक्क आयोग न्यायालयात पाठविल्यामुळे या प्रकरणात न्यायालयात त्यांनी असभ्य व गैरवर्तन करून शिस्तीचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत आणि जालना नगरपालिकेला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून मुख्याधिकाऱ्यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
अत्यावश्यक माहिती मागितली असता बाहेरगावी असल्याचे कारण सांगत माहिती देण्या टाळाटाळ करणे, बाहेरगावी जाताना कोणतीही रजा किंवा वरिष्ठांची परवानगी न घेणे, वरिष्ठांना योग्य त्या संचिका सादर न करणे, असे अनेक ठपके सुरेश सांगुळे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com